• Download App
    देशातील सर्वांत श्रीमंत तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुब्बरेड्डी यांची निवड |Y. V. Suubireddy will be new president of TTD

    देशातील सर्वांत श्रीमंत तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुब्बरेड्डी यांची निवड

    विशेष प्रतिनिधी

    तिरुमला – तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) मंडळाच्या अध्यक्षपदी वाय. व्ही. सुब्बरेड्डी यांची फेरनिवड झाली. देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपती देवस्थानची ओळख आहे. त्यामुळे या मंडळावरील नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.Y. V. Suubireddy will be new president of TTD

    मंडळावर निवड होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात लॉबिंग केले जाते. गेले काही वर्षे या देवस्थानवर सुब्बरेड्डी यांचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. या देवस्थानचा अर्थसंकल्प अफाट मोठा आहे. एखाद्या छोट्या राज्यापेक्षा केवळ या मंदिराचा अर्थसंकल्प मोठा असल्याचे मानले जाते.



    मंदिराची उलाढालदेखील प्रचंड आहे. देवस्थानकडे असलेल्या निधीतून अनेक कल्याणकारी उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात.रेड्डी नुकतीच त्यांनी पदाची शपथ घेतली. देवस्थानचे कार्यकारी अधिकारी डॉ. के. एस. जवाहर रेड्डी यांनी श्री व्यंकटेश्वार स्वामी मंदिरात शपथ दिली. त्यानंतर रेड्डी यांनी कुटुंबीयांसह बालाजीचे दर्शन घेतले.

    देवस्थानाच्या मागील मंडळाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, पण कोरोनाच्या साथीमुळे ते अमलात आणता आले नाही. आगामी काळात हे सर्व कार्यक्रम सुरू करण्यात येतील, असे सुब्बरेड्डी यांनी सांगितले.

    Y. V. Suubireddy will be new president of TTD

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट