• Download App
    वुहानच्या प्रयोगशाळेत कोणीही आजारी नव्हते, ऑस्ट्रेलियातील संशोधकांचा धक्कादायक खुलासा। Wuhan lab not responsible for corona

    वुहानच्या प्रयोगशाळेत कोणीही आजारी नव्हते, ऑस्ट्रेलियातील संशोधकांचा धक्कादायक खुलासा

    विशेष प्रतिनिधी

    सिडनी : कोरोना विषाणूचा उगम चीनमधील प्रयोगशाळेत झाला असल्याचा आणि संशोधनादरम्यान तेथे काम करणरे काही संशोधक आजारी पडल्याची चर्चा असताना २०१९ अखेरपर्यंत तेथे कोणीही आजारी पडले नसल्याचा आश्चनर्यकारक खुलासा डॅनिएली अँडरसन यांनी केला आहे.
    अँडरसन (वय ४२) या ऑस्ट्रेलियाच्या विषाणूतज्ज्ञ आहेत. चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ या संस्थेतील बीएसएल -४ या प्रयोगशाळेत त्यांनी संशोधन केले आहे. तथे त्या नोव्हेंबर २०१९पर्यंत काम करीत होत्या. म्हणजेच कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण चीनमध्येत आढळण्याच्या काही आठवड्याआधीपर्यंत त्या प्रयोगशाळेत होत्या. Wuhan lab not responsible for corona



    ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार डॅनिएली अँडरसन या वटवाघुळांमध्ये असलेल्या विषाणूतील तज्ज्ञ आहे. वुहानमधील विषाणूविज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या त्या एकमेव विदेशी संशोधक आहेत. ‘इबोला आणि निपाहसारख्या साथींना कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंमुळे वटवाघळांमध्ये आजार का निर्माण होऊ शकत नाही,’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. यासाठी त्या गुहांमध्ये विषाणूंचा शोध घेत असतात.

    अँडरसन म्हणाल्या की, माझ्या माहितीनुसार वुहानच्या प्रयोगशाळेत २०१९च्या अखेरपर्यंत कोणीही आजारी पडलेले नव्हते. विषाणूचे संक्रमण झाल्याची लक्षणे आढळल्यास त्याची माहिती देण्याची एक प्रक्रिया आहे. उच्च धोका असलेल्या प्रयोगशाळांमध्ये याचे पालन केले जाते. जर तेथे काम करणारे काही जण आजारी पडले असते, तर माझाही त्यात समावेश असला असता. पण मी एकदम ठणठणीत आहे. लसीकरणापूर्वी सिंगापूरमध्ये मला कोरोना चाचणी करावी लागली होती. जर मी संसर्गबाधित असते तर तसे चाचणीतून दिसले असते.

    Wuhan lab not responsible for corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य