विशेष प्रतिनिधी
कच्छ : ३००० किलो इतके हिरोईन जप्त करण्यामध्ये डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स डिपार्टमेंटला यश मिळाले आहे. गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवरून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या ड्रग्सची किंमत जवळपास ९००० करोड इतकी आहे.
Worth Rs. 9000 crores heroine has been seized at mundra port in gujarat
प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांची अदानी पोर्ट नावाची कंपनी आहे. मुद्रा पोर्ट अदानी कंपनीच्या मालकीचे आहे. डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स आणि स्थानिक पोलीस या दोघांनी मिळून हे ऑपरेशन पार पाडले आहे. मागील काही दिवसांपासून ड्रग रॅकेट संबंधीचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. दोन मोठ्या कंटेंनरमधून हे ९००० कोटी रूपयांचे हेरॉइन पोलिसांनी जप्त केले आहे. त्याचप्रमाणे दोन व्यक्तींना देखील यासंदर्भात अटक झाली आहे. या सर्व गोष्टी मागे एक मोठे ड्रग्ज रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची दाट शक्यता आहे.
ज्या कंटेनरमध्ये हे ड्रग्स सापडले आहेत, ते कंटेनर आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथून घेण्यात आले होते. हसन हुसेन या अफगाणिस्तानच्या व्यक्तीने हे दोन कंटेनर भरून ड्रग्ज भारतात पाठवल्याचा अंदाज प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Worth Rs. 9000 crores heroine has been seized at mundra port in gujarat
महत्त्वाच्या बातम्या
- शपथविधीआधी पंजाब काँग्रेसमध्ये नव्या वादाची फोडणी, हरीश रावत म्हणतात- सिद्धूंच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढू, सुनील जाखड यांचा उघड विरोध, वाचा सविस्तर…
- पोलिसांनी ताब्यात घेताच रेल्वे स्थानकावरच किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद, म्हणाले- ठाकरेंचा 19 बंगल्यांचा घोटाळा, जरंडेश्वरची पाहणी करणार, रोखून दाखवा!
- मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 5 मुले बुडाली; 2 जणांना वाचवण्यात यश; तीन बेपत्ता
- Indian Railway ! सुवर्णसंधी ! रेल्वेने सुरू केली विशेष योजना-50 हजार तरूणांना मिळेल प्रशिक्षण;’या’ 4 ट्रेडमध्ये मिळवू शकतात नोकरी; घ्या सविस्तर माहिती…
- West Bengal : तृणमूलमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियोंचा भाजपविरोधात प्रचार करण्यास नकार;ममता बॅनर्जींचा प्रचार करणार नाहीत