evacuate Hindu Sikh families from Kabul : वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अफगाणिस्तानातील बिघडलेली परिस्थिती पाहता 257 अफगाणी शीख आणि हिंदू कुटुंबांना काबूलमधून लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजीत सिंह साहनी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अफगाण वंशाच्या शीख आणि हिंदूंना सुरक्षितपणे परत आणणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या जिवाला धोका आहे. निवेदनानुसार, संघटना अफगाणिस्तानातून येणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक साहाय्य करण्यास तयार आहे, त्यांना मोफत नोकरीभिमुख प्रशिक्षण दिले जाईल. World Punjabi Organisation urges Home Minister to evacuate Hindu Sikh families from Kabul
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अफगाणिस्तानातील बिघडलेली परिस्थिती पाहता 257 अफगाणी शीख आणि हिंदू कुटुंबांना काबूलमधून लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजीत सिंह साहनी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अफगाण वंशाच्या शीख आणि हिंदूंना सुरक्षितपणे परत आणणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या जिवाला धोका आहे. निवेदनानुसार, संघटना अफगाणिस्तानातून येणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक साहाय्य करण्यास तयार आहे, त्यांना मोफत नोकरीभिमुख प्रशिक्षण दिले जाईल.
साहनी यांनी गेल्या वर्षी काबुल, गझनी, जलालाबाद आणि अफगाणिस्तानच्या इतर भागातून 500 हिंदू आणि शीख कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी तीन चार्टर्ड विमान पाठवले होते. निवेदनानुसार, त्यांनी भारतात आलेल्यांना दीर्घकालीन व्हिसा दिल्याबद्दल गृहमंत्र्यांचे आभार मानले आणि गेल्या वर्षी लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत अशा लोकांना नागरिकत्व देण्याची विनंती केली.
तालिबानने आणखी 4 प्रांत घेतले ताब्यात
अफगाणिस्तानातील दोन दशकांच्या युद्धातून अमेरिकन आणि नाटो सैन्याच्या औपचारिक माघारीच्या काही आठवड्यांआधी, तालिबानने शुक्रवारी देशाच्या संपूर्ण दक्षिण भागावर ताबा मिळवला, आणखी चार प्रांतांच्या राजधानी ताब्यात घेतल्या आणि हळूहळू काबूलच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. गेल्या २४ तासांत तालिबान्यांनी हेलमंड प्रांताची राजधानी लष्करगाह ताब्यात घेतल्यानंतर देशाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्वात मोठ्या शहरांचा ताबा घेतला आहे. पश्चिमेत हेरात आणि दक्षिणेकडील कंधार. हेलमंडमध्ये जवळपास दोन दशकांच्या युद्धात शेकडो परदेशी सैनिक मारले गेले.
World Punjabi Organisation urges Home Minister to evacuate Hindu Sikh families from Kabul
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम मोदी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्याची शक्यता, 76व्या वार्षिक अधिवेशनाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात
- Independence Day : देशभरातील 1,380 पोलिसांना शौर्य आणि सेवा पदके, जम्मू -काश्मीर पोलिसांना सर्वात जास्त 275 पदके
- जम्मू -काश्मिरात स्वातंत्र्यदिनी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैशच्या चार दहशतवाद्यांना अटक
- स्वातंत्र्यदिनी SBIची भेट : गृहकर्जावर प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही, बँक देतेय 6.70% व्याजदराने कर्ज
- राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट एका आठवड्यानंतर पुन्हा सुरू, इतर काँग्रेस नेत्यांचे हँडल्सही अनलॉक