वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : तालिबानला संहारक शस्त्रास्त्रे विकणाऱ्या चीनने अमेरिकेला अफगाणिस्तानला मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचा उपदेश केला आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या आणि दोस्त राष्ट्रांच्या फौजा अफगाणिस्तानमधून एकमद मागे घेऊ नयेत, असा इशाराही दिला आहे. World and USA needs to guide the Taliban in Afghanistan, China tells US
चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकेन यांच्यात गेल्या आठवडाभरात दोनदा फोनवरून चर्चा झाली. त्याचे तपशील दोन्ही देशांनी जाहीर केले आहेत. यातून चीनने अमेरिकेला केलेला उपदेश आणि दिलेला इशारा या बाबी समोर आल्या आहेत.
अमेरिकेने आणि दोस्त राष्ट्रांनी अफगाणिस्तानमधल्या फौजा एकदम मागे घेऊ नयेत. अन्यथा अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना एकजूट करून आपले तळ उभारण्याची संधी मिळू शकते. अनेक दहशतवादी गट आपली पुर्नबांधणी करू शकतात आणि घातपाती कारवाया करू शकतात. यातून सगळ्या जगाला उपद्रव वाढू शकतो, असा इशारा चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी दिला.
त्याच वेळी त्यांनी अमेरिकेने अफगाणिस्तानला मानवतेच्या दृष्टीकोनातून आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. वँग यी म्हणाले, की अफगाणिस्तानातील अर्थव्यवस्था ढासळते आहे. अफगाण चलनाचे वेगाने अवमूल्यन होते आहे. अफगाणिस्तानात महागाई गगनाला भिडली आहे. तिथल्या सामान्य जनतेचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. हे पाहता अमेरिकेने अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मदत करावी. मानवतेच्या दृष्टीकोनातून अन्नधान, वैद्यकीय साहित्य पुरवठा यांसारखी विविध प्रकारची मदत कार्ये सुरू करावीत.
एकीकडे चीनची कम्युनिस्ट राजवट अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता स्थिर व्हावी यासाठी त्यांना शस्त्रास्त्रे विकत आहे. आणखी शस्त्रास्त्रे विकण्याची त्यांची तयारी आहे. तालिबानी राजवटीशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याची त्यांची जोरदार तयारी आहे. तर दुसरीकडे त्याच चिनी कम्युनिस्ट राजवटीतच्या परराष्ट्र मंत्र्याने अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांना फोन करून अफगाण जनतेला मानवतेची मदत करण्याचाही उपदेश केला आहे.
हा उपदेश ऐकल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी देखील वँग यी यांना लेकी बोले सुने लागे या वेगळ्या भाषेत सुनावले. ते म्हणाले, की संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीने अफगाणिस्तानातील तालिबान्यांना हे स्पष्ट सांगितले पाहिजे, की अफगाण नागरिकांच्या सुरक्षेत तडजोड होता कामा नये. तेथे दहशतवादी तळ उभे राहता कामा नयेत. तसे झाले तर याची जबाबदारी तालिबानी राजवटीची राहील. तसेच अफगाणिस्तानमधून परकीय नागरिकांना सुरक्षितपणे त्यांच्या देशात परतण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. अफगाणिस्तान हिंसाचारमुक्त ठेवण्याची जबाबदारी तालिबानची राहील.
सुरक्षा समितीने वरील मुद्दे तालिबान राजवटीला थेट सुनावण्यात चीनचाच अडथळा आहे. कारण तो सुरक्षा समितीचा कायमचा सदस्य आहे. तालिबान बाबत कोणताही ठराव सुरक्षा समितीत आला तर चीन त्याला व्हेटो पॉवर वापरून रोखू शकतो. म्हणूनच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुरक्षा समितीने तालिबानी राजवटीला नेमके काय सुनावले पाहिजे, हे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोनवरून सुनावून घेतले आहे.
World and USA needs to guide the Taliban in Afghanistan, China tells US
महत्त्वाच्या बातम्या
- तिसरी लाट थोपविण्यासाठी दीड लाख आयसीयू बेड तयार ठेवा , निती आयोगाची सूचना
- मुबंईकरांसाठी खूषखबर, कोरोनाचा आलेख वेगाने लागला घसरू, पॉझिटीव्हीटी दर अवघा एक टक्यादहशतवर
- जन्माष्टमीच्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी आणि सर्व दिग्गजांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
- अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभरातील सर्व जिहादींना आसुरी आनंद, अमेरेकिचे मित्र ब्लेअर कडाडले