• Download App
    महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षाने सोडली पातळी, विमानात स्मृति इराणी यांच्यासोबत नळावर भांडावे तसा घातला वाद|Women's Congress president arguing with Smriti Irani on plane

    महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षाने सोडली पातळी, विमानात स्मृति इराणी यांच्यासोबत नळावर भांडावे तसा घातला वाद

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : किमान सामाजिक संकेतांचे पालनही करायचे नाही असे कॉँग्रेसच्या नेत्यांनी ठरविले आहे. महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसुझा यांनी तर पातळी सोडत महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांच्यासोबत विमानप्रवास नळावरील भांडावे तसा वाद घातला.Women’s Congress president arguing with Smriti Irani on plane

    स्मृति इराणी आणि डिसुझा या एकाच विमानात प्रवास करत होत्या. यावेळी नेटा डिसुझा यांनी महागाईबाबत स्मृती इराणी यांना विमानातच प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.ही घटना दिल्ली-गुवाहाटी विमानाच्या प्रवासादरम्यान घडली. विमानात नेटा डिसुझा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आमने-सामने आल्या तेव्हा त्यांनी स्मृती इराणींना स्वयंपाकाच्या गॅसबद्दल प्रश्न विचारला.



    त्यांनी याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी जवळपास १ मिनिट ११ सेकंदाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये स्मृती इराणी नेटा डिसुझा यांच्या प्रश्नाचं कोणतंही थेट उत्तर देताना दिसत नाही आहेत.यादरम्यान, स्मृती इराणी यांनी लोकांना पहिले विमानातून उतरू द्या त्यांना समस्या होत आहे असं सांगितलं.

    यावर उत्तर देताना डिसुझा यांनी हा लोकांचाच प्रश्न असल्याचं म्हटलं.विमानात शाब्दिक चकमक प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशानं स्मृती इराणी यांना हॅप्पी बिहू असे विश केलं. यावर त्यांनीही उत्तर दिलं. यावर डिसुझा यांनी हॅप्पी बिहू, विना स्टो, विना गॅस असं म्हटलं. यावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही चुकीचं बोलताय असं म्हटले.

    आपल्या परवानगीशिवाय तुम्ही रेकॉर्डिंग करत आहात, असं इराणी म्हणाल्या. यावर उत्तर देताना तुम्ही महत्त्वाच्या पदावर आहात, लोकांना तुमच्याकडून उत्तर हवं आहे, असं डिसुझा म्हणाल्या. यावर पुन्हा इराणी यांनी उत्तर देत कोरोनाच्या काळात देशातील सर्व नागरिकांना मोफत लस दिल्याचे सांगितले.

    Women’s Congress president arguing with Smriti Irani on plane

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार