• Download App
    ममतादीदी अजून किती महिलांवर बलात्कार होताना शांतपणे पाहणार आहेत?; स्मृती इराणींचा संतप्त सवाल|Women are taken away from their homes&being raped openly, be it Dalit or tribal woman. smriti irani

    ममतादीदी अजून किती महिलांवर बलात्कार होताना शांतपणे पाहणार आहेत?; स्मृती इराणींचा संतप्त सवाल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या चौकशीच्या बाजूने कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचे भाजपच्या राज्य प्रभारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वागत केले. त्याचवेळी त्यांनी राज्यात होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत संताप व्यक्त केला.Women are taken away from their homes&being raped openly, be it Dalit or tribal woman. smriti irani

    मुख्यमंत्री ममतादीदी अजून किती महिलांवर बलात्कार होताना शांतपणे पाहणार आहेत?, असा संतप्त सवाल इराणी यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या काळात आणि निवडणूक निकालानंतर घडलेल्या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग करीत आहे.



    त्याच्यावर ममता बॅनर्जी सरकारचा आक्षेप आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे मानवी हक्क आयोगावर त्यांचा दबाव आहे. त्यामुळे ते निःपक्षपातीपणाने चौकशी करून रिपोर्ट देऊ शकणार नाहीत, असा ममता बॅनर्जी सरकारचा आरोप आहे. मात्र, कोलकाता हायकोर्टाने ममता बॅनर्जी सरकारची याचिका फेटाळून लावली आहे.

    कोलकाता हायकोर्टाच्या निर्णयाचे स्मृती इराणी यांनी स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या, महिलांना त्यांच्या घरातून बाहेर काढले जात आहे. ती दलित असो की आदिवासी तिच्यावर घरच्यांसमोर बलात्कार केला जात आहे. ६० वर्षांच्या एका महिलेला घराबाहेर काढून गुंडांनी तिच्यावर तिच्या ६ वर्षांच्या नातवासमोर बलात्कार केला. ती भाजपची कार्यकर्ती आहे म्हणून तिला गुंडांनी ही शिक्षा दिली.

    ममतादीदी अजून किती महिलांवर बलात्कार होताना शांतपणे पाहणार आहेत?, असा संतप्त सवाल इराणी यांनी केला. ममतादीदींच्या पक्षाला मते दिली नाहीत म्हणून त्या बंगाली जनतेचे हे शिरकाण शांतपणे पाहात आहेत, असा आरोप इराणी यांनी केला.

    Women are taken away from their homes&being raped openly, be it Dalit or tribal woman. smriti irani

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते