विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोविन पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरातील ३.८३ लाख जणांना कोणत्याही ओळखपत्राशिवाय कोरोना लस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लोकसभेत दिली आहे. without adhar card lakhs of people vaccinated
त्या म्हणाल्या की, २६ जुलै २०२१ पर्यंत एकूण ३.८३ लाख व्यक्तींना कोणत्याही ओळखपत्राशिवाय कोरोना लस दिली. याव्यतिरिक्त ओळख नसलेल्या व्यक्तींनाही विशेष सत्रांद्वारे लस घेता येईल. ओळखपत्र नसलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एसओपी जारी केली आहे.
डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध नसणाऱ्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावर एकट्याने किंवा समूहाने जाऊन नोंदणी करून लस घेता येऊ शकते. एका मोबाईल क्रमांकावर जास्तीत जास्त चार जणांची नोंदणी करता येते. मोबाईल नसणाऱ्यांना कोविड-१९ ची १०७५ ही राष्ट्रीय हेल्पलाईन तसेच राज्याच्या हेल्पलाईनचाही पर्याय आहे.
without adhar card lakhs of people vaccinated
महत्त्वाच्या बातम्या
- Assam-Mizoram Border Dispute : मिझोराम पोलिसांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात दाखल केला एफआयआर, 1 ऑगस्टला ठाण्यात हजर राहण्यास सांगितले
- Covid-19 Vaccine : काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी अखेर घेतली कोरोनाची लस, पहिला डोस घेतल्यामुळे राहुल गांधी दोन दिवसांपासून संसदेत गैरहजर
- देशात तिसरी लाट केरळमधून येण्याची भीती, कोरोना रुग्णसंख्या वाढतेय ; ईशान्य भारतात परिस्थिती बिकट
- Tokyo Olympics : अतनु दासपाठोपाठ बॉक्सर अमित पंघालही बाहेर ; कमलप्रीत कौर फायनलमध्ये