कन्नड व्यावसायिकांना मुंबईत व्यवसाय करणे अवघड होईल हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य राष्ट्रविरोधी आहे. कॉँग्रेसचे कर्नाटकातील नेते यावर मुग गिळून गप्प का आहेत? त्यांचा निषेध करणार का? असा सवाल कर्नाटक भारतीय जनता पक्षाने केला आहे.
Will the Congress leader protest against the Marathi-Kannada controversy dug up by Sanjay Raut? Karnataka BJP’s question
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कन्नड व्यावसायिकांना मुंबईत व्यवसाय करणे अवघड होईल हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य राष्ट्रविरोधी आहे. कॉँग्रेसचे कर्नाटकातील नेते यावर मुग गिळून गप्प का आहेत? त्यांचा निषेध करणार का? असा सवाल कर्नाटक भारतीय जनता पक्षाने केला आहे.
संजय राऊत यांनी ‘सामना’ मधील आपल्या रोखठोक या सदरामध्ये लिहिले आहे की, फ बेळगावला महाराष्ट्र सरकारचे एक अधिकृत कार्यालय त्यांनी उघडावे. म्हणजे सीमा बांधावांचा महाराष्ट्रातील कामांसाठी संपर्क राहील. स्कर्नाटक सरकाचे बरेचसे अर्थकारण महाराष्ट्रवर अवलंबून आहे, हे कुणीच समजून घेत नाही. कर्नाटकातून रोज किमान ६५० सरकारी बस महाराष्ट्रात येतात.
महाराष्ट्रातून रोज फक्त ५० बस कर्नाटकात जातात. कर्नाटकाच्या परिवहन खात्यालाच महाराष्ट्रातून रोज ३० लाखांचा महसूल मिलतो. त्यामुळे बेळगावात मराठी लोकांवर हल्ले होताच कोल्हापूर-सांगलीत शिवसेनेचे लोक कर्नाटकाच्या बसवर हल्ले करून बदला घेतात. हे लोण मुंबईत पोहोचले तर कर्नाटकातील लोकांचे व्यापर-उद्योग चालविणे कठीण होईल.
कॉँग्रेसचे माजी मु्ख्यमंत्री सिध्दरामय्या आणि अध्यक्ष डी. के. शिवकुमार राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करणार का? महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या कन्नडविरोधी भूमिकेचा निषेध करणार का? असा सवालही भाजपाने केला आहे.
बंगळुरुचे भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी म्हटले आहे की कॉँग्रेसचे सत्तेचे प्रेम कर्नायकावरील प्रेमापेक्षा जास्त आहे, हेच यातून दिसत आहे. शिवसेना- राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस आघाडीचे सरकार देशाची अप्रतिष्ठा करत आहे.
Will the Congress leader protest against the Marathi-Kannada controversy dug up by Sanjay Raut? Karnataka BJP’s question
महत्त्वाच्या बातम्या
- कट्टरतावादासमोर पाक सरकारची पुन्हा सपशेल शरणागती , फ्रान्सच्या राजदूताची गच्छंती अटळ
- बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचाराची शक्यता; आज सहाव्या टप्प्यातील ४३ जागांसाठी मतदान
- कोरोना रुग्णांसाठी मशिदीमध्ये उभारले कोविड सेंटर ; गुजरातमधील वडोदरात सामाजिक बांधिलकी जपली
- महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली, भाजीपाला, बेकरीला आता चार तासांचाच वेळ
- खेड्यामध्ये ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला अनेकांनी काढलं होत वेड्यात ; आज तोच वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण