• Download App
    कॉंग्रेस दाखविणार का घराणेशाही संपविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची हिंमत, राहूल, प्रियंका गांधींनाच निवडणूक लढविणे होणार अशक्य Will Congress show courage to approve proposal to end dynasty, Rahul, Priyanka Gandhi will not be able to contest elections

    कॉंग्रेस दाखविणार का घराणेशाही संपविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची हिंमत, राहूल, प्रियंका गांधींनाच निवडणूक लढविणे होणार अशक्य

    कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात घराणेशाही संपविण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्याची हिंमत कॉंग्रेस दाखविणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रस्तावानुसार चिंतन शिबिरात काँग्रेसला एक कुटुंब, एक तिकीट हा प्रस्ताव मंजूर करावा लागेल. मात्र, तसे झाल्यास कॉंग्रेसचें अनेक दिग्गज नेते अडचणीत येणार आहेतच, पण खुद्द गांधी कुटुंबियही संकटात सापडणार आहे. राहूल आणि प्रियंका गांधी यांनाच निवडणूक लढविणे अशक्य होणार आहे. Will Congress show courage to approve proposal to end dynasty, Rahul, Priyanka Gandhi will not be able to contest elections


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात घराणेशाही संपविण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्याची हिंमत कॉँग्रेस दाखविणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रस्तावानुसार चिंतन शिबिरात काँग्रेसला एक कुटुंब, एक तिकीट हा प्रस्ताव मंजूर करावा लागेल. मात्र, तसे झाल्यास कॉँग्रेसचें नेक दिग्गज नेते अडचणीत येणार आहेतच, पण खुद्द गांधी कुटुंबियही संकटात सापडणार आहे. राहूल आणि प्रियंका गांधी यांनाच निवडणूक लढविणे अशक्य होणार आहे.



    कॉंग्रेसच्या कार्यकारिणीत हा प्रस्ताव मांडला गेला आहे. मात्र, तो मंजूर करणे काँग्रेससाठी हे मोठे आव्हान असणार आहे. गांधी कुटुंबापासून ते हुड्डा, गेहलोत, कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि खरगे यांच्यासारखे काँग्रेसचे अनेक मोठे नेते आणि त्यांचे चिरंजीव असे दोघेही निवडणूक लढतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीतून आणि राहुल गांधी यांनी अमेठी व वायनाडमधून निवडणूक लढविली होती. गेल्या निवडणुकीत सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीतून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव होता. त्यावेळी एकाच कुटुंबातील तीन- तीन सदस्य निवडणूक लढवित आहेत हा संदेश जाऊ नये म्हणून हा प्रस्ताव मंजूर झाला नाही.

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी चर्चा झाली; मात्र असे सांगितले जात आहे की, प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी पुढील निवडणूक लढविणार नाहीत. त्यांच्या जागी प्रियांका गांधी निवडणूक लढवू शकतात; मात्र आता नव्याने प्रस्ताव मंजूर झाल्यास राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांच्यापैकी एकजणच निवडणूक लढवू शकेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या चिरजीवांना जोधपूरमधून तिकीट देण्यात आले होते. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा आणि त्यांचे पुत्र दीपेंद्र हुड्डा या दोघांनाही लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

    Will Congress show courage to approve proposal to end dynasty, Rahul, Priyanka Gandhi will not be able to contest elections

     

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!