• Download App
    विरोधकांचे ऐक्य झाले तर का नाही होणार??; एम. के. स्टालिन यांचे पंतप्रधान पद अब्दुल्लांना मंजूर!!; पण बाकीच्यांचे काय??Why not if the opposition is united

    विरोधकांचे ऐक्य झाले तर का नाही होणार??; एम. के. स्टालिन यांचे पंतप्रधान पद अब्दुल्लांना मंजूर!!; पण बाकीच्यांचे काय??

    वृत्तसंस्था

    चेन्नई : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांना तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टालिन हे पंतप्रधानपदी मंजूर आहेत. विरोधकांचे ऐक्य झाले, तर स्टालिनही पंतप्रधान होऊ शकतात. त्यात चूक काय?, असा सवाल त्यांनी पत्रकारांना चेन्नई विमानतळावर केला. Why not if the opposition is united

    एम. के. स्टालिन यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी सकाळी आपले वडील एम. करुणानिधी यांच्यासह द्रविड मुन्नेत्र कळघमच्या सर्व मान्यवरांच्या समाधीचे दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. आज सायंकाळी चेन्नईमध्ये स्टालिन यांच्या अभिनंदनची सभा होत आहे. या सभेमध्ये प्रामुख्याने विरोधकांचे ऐक्य दिसून येणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, डॉ फारूक अब्दुल्ला आदी नेते या सभेसाठी चेन्नई पोहोचले आहेत. एम. के. स्टालिन हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात का?, असा सवाल डॉ. फारूक अब्दुल्ला यांना विमानतळावर पत्रकारांनी विचारल्यानंतर विरोधकांचे ऐक्य झाल्यावर तसे का नाही होणार? एम. के. स्टालिन हे देखील पंतप्रधान बनू शकतात, असे उत्तर डॉ. फारूक अब्दुल्लांनी दिले.

    पण याच एम. के. स्टालिन यांनी 2018 पासून राहुल गांधींची पंतप्रधान पदाची उमेदवारी सातत्याने पुढे केली होती. सर्व विरोधकांनी मिळून राहुल गांधींनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार केले पाहिजे, यासाठी त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आग्रह धरला होता.

    मात्र स्टालिन यांच्या 70 व्या वाढदिवशी त्यांच्याच पंतप्रधान पदाची स्पर्धा डॉ. फारूक अब्दुल्लांनी सुरू केली आहे. पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची नावे आधीच शर्यतीत आहेत. आता त्यांच्यासह एम. के. स्टालिननही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत दाखल झाले आहेत. आता ही पंतप्रधानपदाची शर्यत नेमकी किती नावापर्यंत पोहोचणार? आणि त्यापैकी नेमके कोणते नाव सर्व विरोधकांना मतैक्याने मान्य होणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Why not if the opposition is united

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची