• Download App
    पुनीत राजकुमारच्या फॅमिली डॉक्टरांना का दिले जातेय पोलीस संरक्षण? | Why is Puneet Rajkumar's family doctor given police protection?

    पुनीत राजकुमारच्या फॅमिली डॉक्टरांना का दिले जातेय पोलीस संरक्षण?

    विशेष प्रतिनिधी

    बंगलोर : कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड दुःख पसरले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने पुनीत राजकुमार यांचे निधन झाले असले तरी त्याच्या चाहत्यांनी मात्र त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि त्याच्या फॅमिली डॉक्टरांना त्याच्या मृत्यूला जबाबदार धरले आहे. सोशल मिडीयाचा वापर करुन अनेक अफवा पसरवल्या जात आहेत.

    Why is Puneet Rajkumar’s family doctor given police protection?

    त्यामुळे त्याचे फॅमिली डॉक्टर रमण राव यांना अनेक धमकीवजा फोन येत असल्याने त्यांनी पोलिसांकडून संरक्षणाची मागणी केली आहे. रमण राव यांच्याकडून पोलिस संरक्षणाची मागणी केल्यानंतर त्यांच्या घराच्या बाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्नाटकातील प्रायव्हेट हॉस्पिटल अँड नर्सिंग होम असोसिएशन (फाना) मात्र या गोष्टींमुळे चिंतेत आहे.


    पुनित राजकुमार यांच्या दोन डोळ्यांनी दिली चार लोकांना दृष्टी


    फानाचे अध्यक्ष प्रसन्न एचएम यांनी मुख्यमंत्री बसवराज गोमाई यांना विनंती केली की, पुनीत राजकुमारच्या मृत्यूनंतर आरोग्य व्यवस्थेला ज्याप्रकारे दाखवले जात आहे त्याबद्दल चिंता आहे. पुनितच्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनालाही मोठा धक्का बसला आहे. पण त्याचा मृत्यू ज्या पध्दतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवला जात आहे ते अत्यंत चुकीचे आहे. आणि यावेळी आरोग्य विभागाचे मनोबल वाढवणे अतिशय गरजेचे आहे. अशी विनंती प्रसन्ना यांच्याकडून मुख्यमंत्री यांना करण्यात आली होती.

    दरम्यान पुनीतचे फॅमिली डॉक्टर रमण राव यांनी सांगितले, पुनीत जेव्हा हॉस्पिटलमध्ये आला होता, तेव्हा त्याला अशक्तपणा जाणवत होता. त्याचे ब्लड प्रेशर नॉर्मल होते. पण त्याला कंटिन्युअस घाम येत होता, जो जिम केल्यानंतर साधारणतः येतोच. तरीही त्यांनी ईसीजी चेक केला. ईसीजीमध्ये चढ उतार दिसल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्याला विक्रम हॉस्पिटमध्ये दाखल करण्यास सांगितले होते. आणि त्याच्या पत्नीने त्याला होकार देऊन त्याला विक्रम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

    29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.40 वाजता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते आणि 2.30 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले होते.

    Why is Puneet Rajkumar’s family doctor given police protection?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!