• Download App
    Karnataka CM : येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकचा कारभारी कोण? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही 3 नावे । Who Will Be Nex Karnataka CM After Yeddiyurappa resign, these three leaders in race

    Karnataka CM : येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकचा कारभारी कोण? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही 3 नावे

    Karnataka CM : सोमवारी कर्नाटकच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला. भाजप नेते व राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजकीय घडामोडीनंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते कर्नाटकच्या नव्या कारभाऱ्याकडे. भाजप मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणावर सोपवणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. या शर्यतीत अनेक नावं असली तरी प्रामुख्याने तीन जणांमध्ये स्पर्धा आहे. Who Will Be Next Karnataka CM After Yeddiyurappa resign, these three leaders in race


    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : सोमवारी कर्नाटकच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला. भाजप नेते व राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजकीय घडामोडीनंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते कर्नाटकच्या नव्या कारभाऱ्याकडे. भाजप मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणावर सोपवणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. या शर्यतीत अनेक नावं असली तरी प्रामुख्याने तीन जणांमध्ये स्पर्धा आहे.

    संसद भवनात जेपी नड्डा आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली आणि कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाली. भाजप निरीक्षकाचे नाव आज संध्याकापर्यंत निश्चित करणार आहे, जे पुढच्या एक-दोन दिवसांत कर्नाटकात जातील. या आठवड्याच्या अखेरपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या नावाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत येडियुरप्पा हे कर्नाटकचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. सूत्रांनुसार धर्मेंद्र प्रधान हे निरीक्षक असण्याची शक्यता जास्त आहे.

    मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ही तीन नावे

    कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी रविवारपर्यंत तीन नावे आली होती. पहिले नाव आहे बसवराज बोम्मई यांचे. ते लिंगायत समाजातील असून सध्या गृहमंत्री तसेच संसदीय कामकाज मंत्री आणि कर्नाटक सरकारमध्ये कायदा मंत्री आहेत. दुसरे नाव आहे विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचे, ते ब्राह्मण आहेत आणि कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष आहेत. तिसरे नाव केंद्रीय कोळसा खाण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांचे आहे.

    असे मानले जाते की, आरएसएसला येडियुरप्पा यांच्या जागी लिंगायत समाजातील दुसरे मंत्री किंवा आमदार यांना आणायचे आहे. परंतु यावेळी लिंगायत नसलेले मुख्यमंत्री बनविण्याचा विचारही भाजप करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

    येडियुरप्पांना न हटवण्याची लिंगायत संतांची मागणी

    येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या वेळी 500 हून अधिक लिंगायत संतांनी येडियुरप्पा यांना न हटविण्याची मागणी केली होती. रविवारी मुरुगा मठाचे संत श्री शिवमूर्ती शरणारू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, (येडियुरप्पा) ते मुख्यमंत्रिपदी असावेत अशी आमची इच्छा आहे, परंतु हा निर्णय हायकमांड (भाजप) वर आहे. ते म्हणाले की, भाजपा हाय कमांड योग्य निर्णय घेईल.

    येडियुरप्पांच्या दिल्ली वारीनंतर सुरू झाली होती चर्चा

    कर्नाटकच्या राजकारणाबद्दल बर्‍याच काळापासून कयास बांधले जात होते. नुकतेच बी.एस. येडियुरप्पा नवी दिल्ली येथे आले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. यानंतरच येडियुरप्पा त्यांचे पद सोडू शकतात, असे कयास बांधले जात होते.

    तेव्हापासून बी.एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याविषयीची चर्चा तीव्र झाली होती, तेव्हापासून लिंगायत समुदायातील लोकांचे बी.एस. येडियुरप्पांना भेटणे सुरू होते. अशा परिस्थितीत या बैठकांना केंद्रीय नेतृत्वाला देण्यात येत असलेल्या संदेशाच्या रूपात पाहिले जात आहे. तथापि, नंतर केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतल्यास आपण राजीनामा देऊ, असे येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले होते.

    2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कॉंग्रेस-जेडीएस सरकार स्थापन झाले, परंतु हे सरकार केवळ एक वर्ष टिकू शकले आणि नंतर भाजपने बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात स्वत:चे सरकार स्थापन केले होते.

    Who Will Be Next Karnataka CM After Yeddiyurappa resign, these three leaders in race

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले