प्रतिनिधी
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू कर्णधार विराट कोहलीने टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्याची घोषणा केल्यानंतर ती जागा कोण पटकावणार, याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यातच आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार, याचीही चर्चा सुरू आहे. या पदासाठी अनेक दिग्गज खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.Who will be Indian cricket team coach?? Anil Kumble or V.V.S. Laxman
रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. टी-20 विश्वचषकानंतर शास्त्री प्रशिक्षकपदाला रामराम करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे या पदासाठी अनेक दिग्गज खेळाडूंची नावे शर्यतीत आहेत. यामध्ये भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याचे नाव आघाडीवर आहे.
2016 साली कुंबळेने प्रशिक्षक पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. पण कोहली आणि त्याच्यात काही मतभेद झाल्याने कुंबळे पायउतार झाला होता. कुंबळेसोबतच विख्यात माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव देखील या पदासाठी चर्चेत आहे. आयपीएलमध्ये लक्ष्मण सनरायजर्स हैद्राबाद संघाचा मेन्टॉर आहे.
भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतो, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने सुद्धा या पदासाठी प्रमुख दावेदार म्हणून ओळखला जात आहे. जयवर्धने या एकमेव भारताबाहेरील खेळाडूचे नाव या पदासाठी मोठ्या चर्चेत आहे. जयवर्धने सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.
Who will be Indian cricket team coach?? Anil Kumble or V.V.S. Laxman
महत्त्वाच्या बातम्या
- डोंबिवलीत पाण्यापाई तरुणीचा हात मोडला कल्याण-डोंबिवलीत २७ गावे तहानलेली
- दोन प्रौढ व्यक्तींना धर्माचा विचार न करता जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप