• Download App
    व्हाईट कॉलर जिहादी जातीय संघर्ष निर्माण करू शकतात, जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी व्यक्त केली शक्यता|White-collar jihadists could create communal conflict, the possibility was expressed by the Director General of Police of Jammu and Kashmir

    व्हाईट कॉलर जिहादी जातीय संघर्ष निर्माण करू शकतात, जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी व्यक्त केली शक्यता

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : व्हाईट कॉलर पांढरपेशी जिहादी समाजमाध्यमात चिथावणीखोर बातम्या पसरवून युवकांमध्ये भारतविरोेधी द्वेषभावना निर्माण करून जातीय संघर्ष निर्माण करू शकतात, असा इशारा जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबागसिंग यांनी दिला आहे.White-collar jihadists could create communal conflict, the possibility was expressed by the Director General of Police of Jammu and Kashmir

    सायबर दहशतवादी प्रत्यक्ष दहशतवाद्यांपेक्षा घातक असतात; कारण तो लपून बसलेला असतो आणि पूर्णपणे अज्ञात असतो, असेही त्यांनी सांगितले.दिलबागसिंग म्हणाले, हे युद्ध नवीन असून, यात पारंपरिक शस्त्रास्त्रे, अरुंद रस्ते व जंगलातील युद्धाचे क्षेत्र संगणक व स्मार्टफोनमध्ये परिवर्तित झाले आहे.



    अलिकडेच जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाच संशयित जिहादींना अटक केली. त्यांच्यावर देशाच्या सार्वभौमत्वाबद्दल खोट्या बातम्या पसरविण्याचा आरोप होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पांढरपेशी जिहादींकडे सरकारी अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वकील व राजकीय कार्यकर्त्यांची काळी यादी तयार करण्याचे काम देण्यात आले होते.

    White-collar jihadists could create communal conflict, the possibility was expressed by the Director General of Police of Jammu and Kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची