विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानातून परागंदा झालेले अध्यक्ष अश्रफ घनी यांना आता कोणता देश आश्रय देणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने ते अध्यक्ष झाले होते. त्यामुळे ते अमेरिकेत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.Which country will give stay to Ghani
घनी यांनी देश सोडताच काल त्यांना ताजिकिस्तानने पहिला झटका दिला होता. अफगाणिस्तानातून ताजिकिस्तान येथे आलेल्या घनी यांच्या विमानाला उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना नाईलाजाने ओमानला थांबावे लागले होते. आता ते ओमानहून अमेरिकेला रवाना होवू शकतात.
अश्रफ घनी यांच्याशिवाय अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहिब देखील ओमानमध्ये आहेत. दोघांच्या विमानाला ताजिकस्तानमध्ये उतरता आले नाही आणि त्यांना ओमानकडे वळावे लागले. ७२ वर्षीय अश्रफ घनी हे अफगाणिस्तानचे चौदावे अध्यक्ष आहेत. त्या आधी ते देशाचे अर्थमंत्री आणि काबूल विद्यापीठाचे कुलगुरू देखील राहिले आहेत.
Which country will give stay to Ghani
विशेष प्रतिनिधी
- तालिबानवरून अमेरिकेत सुरु झाले राजकारण, डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांना घेतले फैलावर
- कोरोना महामारीच्या काळात ३०४ एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंब पोरकी
- ओबीसी समाज भोळा पण त्याीला आहे तिसरा डोळा, आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही – पंकजा मुंडे
- महाराष्ट्रात डेल्टा प्लसने वाढविली चिंता, राज्यात आणखी १० नव्या रुग्णांची नोंद
- अमेरिका बाहेर पडताच तालिबानशी मैत्रीला चीनने दर्शविली तयारी