प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंटरपोलची ९० वी महासभा यंदा भारतात होत आहे. यात १९५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या महासभेला सुरूवात झाली असून अमित शहा यांच्या भाषणाने या महासभेचा समारोप होणार आहे. या महासभेसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्याची दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि दाऊदचे नाव ऐकून बोलती बंद झाली. When will Dawood – Hafiz Saeed be handed over to India?
या महासभेत सामील झालेल्या पाकिस्तानचे फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक मोहसीन बट यांना भारतीय पत्रकाराने प्रश्न विचारला, दाऊद आणि हाफिज सईदला भारताच्या स्वाधीन केव्हा करणार? यावर मोहसीन तोंडावर बोट ठेवून दुर्लक्ष करून खाली बसले.
इंटरपोलच्या महासभेवेळी एका पत्रकाराने मोहसीन बट यांना प्रश्न विचारला यावर मोहसीन बटने नकार दर्शवला त्यावर पत्रकाराने सांगितले प्रश्न ऐका तुम्हाला हवे असल्यास उत्तर द्या किंवा नका देऊ. त्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुढे जातील का? हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम भारतात मोस्ट वॉन्टेड आहेत, तुम्ही त्या दोघांना भारताच्या हवाली कधी करणार? यावर मोहसीनने तोंडावर बोट ठेवले.
इंटपोल म्हणजे काय?
जगभरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी १९२३ मध्ये या संघटनेची स्थापना केली. ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. त्याची स्थापना व्हिएन्ना, ऑस्ट्रियामध्ये झाली. १९५ देश इंटरपोलचे सदस्य आहेत. १९९७ मध्ये भारतात इंटरपोल महासभेचे आयोजन करण्यात आले होते.
When will Dawood – Hafiz Saeed be handed over to India?
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची दिवाळी भेट : आज पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!!
- संभाजीनगर + नाशिकच्या कंपन्यांमधील 1060 जागांसाठी आजपासून रोजगार मेळावा; व्हा ऑनलाईन सहभागी
- अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध??; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या “अशाही” आठवणी!
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??