वृत्तसंस्था
कोलकाता : आत्तापर्यंत सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकार आणि भाजपवर केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत होते. परंतु आता त्यापुढे जात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या नेत्यांनाच केंद्रीय तपास संस्थान कडून कान खेचून बाहेर काढण्याची धमकी दिली आहे. When the BJP is out of power, the Central Investigation Agency will take its leaders by the ear and throw them out of the house
पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी दुर्गा पूजेच्या मांडवात महात्मा गांधींना महिषासुर रूपात दाखवल्याबद्दलही टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, की भाजपचे नेते आज सत्तेवर आहेत त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवत आहेत. परंतु त्यांची सत्ता कायम राहणार नाही. भाजपचे नेते जेव्हा सत्तेतून बाहेर पडतील, तेव्हा याच केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या घरात घुसतील आणि त्यांचे कान पकडून त्यांना बाहेर खेचतील. हा दिवस फार दूर नाही जनता त्यांना धडा नक्की शिकवेल.
दुर्गा पूजेदरम्यान काही लोकांनी मांडवात महात्मा गांधींना महिषासुर या राक्षसाच्या रूपात दाखवले होते. त्यांना काय शिक्षा दिली पाहिजे? त्यांना आगामी निवडणुकीत जनताच शिक्षा देईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्या या धमकीमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले असून भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचारी नेत्यांनाच केंद्रीय तपास यंत्रणा तुरुंगात घालतात असा पलटवार केला आहे.
ममतांचे मंत्री ईडीच्या कोठडीत
ममता बॅनर्जी यांचा भाचा खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुचिरा यांच्याविरुद्ध 400 कोटी रुपयांच्या कोळसा खाण घोटाळा गैरव्यवहारात ईडीची चौकशी आणि तपास सुरू आहे. सध्या हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत. याखेरीज ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री पार्थ चटर्जी हे देखील शिक्षक भरतीच्या हजारो कोटींच्या घोटाळ्यात ईडीच्या कोठडीत आहेत. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी भाजपच्या नेत्यांना ते सत्तेवरून गेल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचा कान पकडून घराबाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.
When the BJP is out of power, the Central Investigation Agency will take its leaders by the ear and throw them out of the house
महत्वाच्या बातम्या
- राज्यात 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या : आस्तिककुमार पांडेय औरंगाबादचे जिल्हाधिकारी
- कर्नाटक हिजाब वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : 10 दिवस युक्तिवाद ऐकल्यानंतर राखून ठेवला होता निकाल
- सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत वाढ : भाजीपाला आणि डाळींच्या किमती वाढल्याने महागाई 7.41% वर पोहोचली, ऑगस्टमध्ये 7% होती
- UNGA मध्ये रशियाविरोधात निषेधाचा ठराव मंजूर : 143 देशांचा युक्रेनच्या 4 भागांवर रशियाच्या कब्जाला विरोध, भारत मतदानापासून दूर