- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतांना प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत.
- त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत करोना स्थितीचा आढावा घेतला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती ही अत्यंत बिकट असल्याचं पाहायला मिळत आहे. याच स्थितीचा नेमका आढावा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन घेतला आहे . यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेेंसोबत राज्यातील कोरोना स्थितीविषयी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली.महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई चांगली लढत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच कौतुक देेखील केलं आहे.when PM Calls CM of Maharashtra! Uddhav Thakrey says thank you Modiji
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.