• Download App
    पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ही चूकच : काँग्रेसचे प्रचार प्रमुख सुनील जाखड; कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या सुरात सूर मिसळला सूर!! What has happened today is just not acceptable. It's against Panjabiyat.

    पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ही चूकच : काँग्रेसचे प्रचार प्रमुख सुनील जाखड; कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या सुरात मिसळले सूर!!

    वृत्तसंस्था

    चंडीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत जी त्रुटी राहिली ही चूकच आहे. अशा गोष्टी अजिबात स्वीकारणे योग्य नाही, अशा स्पष्ट शब्दात काँग्रेसचे प्रचारप्रमुख सुनील जाखड आपल्याच पंजाब मधल्या काँग्रेस सरकारला फटकारले आहे. What has happened today is just not acceptable. It’s against Panjabiyat.

    काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी पंतप्रधानांवर जो टीकेचा सूर लावला आहे त्यापेक्षा पंजाब काँग्रेसच्या प्रचार प्रमुखांचा सूर निश्चितच वेगळा आहे. तो सूर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या सुराशी जुळत आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिरोजपूरचा दौरा रद्द करावा लागला. त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळल्या. दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी मी जिवंत परत येऊ शकलो. तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, असे सांगा असे वक्तव्य भटिंडा विमानतळावर केले होते.

    या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली आहे. आम आदमी पार्टीने देखील काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. परंतु पंजाब काँग्रेसचे प्रचारप्रमुख सुनील जाखडे यांनी मात्र पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि उल्लंघन हे चूकच असल्याचे म्हटले आहे.

    कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील पंजाब मध्ये कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेल्याची टीका केली आहे. त्यामुळे सुनील जाखड त्यांनी आपल्याच सरकारला जे घेरले आहे ते कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या राजकीय सुराशी सूर जुळवणे आहे.

    What has happened today is just not acceptable. It’s against Panjabiyat.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!