• Download App
    मोदींनी उल्लेख केलेले, इंदिरा गांधींनी घोडचूक केलेले कच्छथिवू नेमके आहे काय??; त्याचे स्ट्रॅटेजिक महत्त्व काय?? What exactly is Kachthivu that Indira Gandhi blundered about?

    मोदींनी उल्लेख केलेले, इंदिरा गांधींनी घोडचूक केलेले कच्छथिवू नेमके आहे काय??; त्याचे स्ट्रॅटेजिक महत्त्व काय??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अविश्वास ठरावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात कच्छथिवूचा उल्लेख केला, हे कच्छथिवू नेमके आहे काय??, ते आहे कोठे??, त्याचा ठळक उल्लेख मोदींच्या भाषणात आला. What exactly is Kachthivu that Indira Gandhi blundered about?

    हा कच्छथिवू भाग श्रीलंका आणि तामिळनाडूच्या मध्यावर आहे. तो रामसेतूला जोडतो. तेथे थोरियमचा प्रचंड साठा आहे आणि तो चीनच्या वर्चस्ववादाला “बहाल” केला गेला आहे. ही कहाणीच मोदींनी आज लोकसभेत उजागर केली.

    याची कहाणी थोडक्यात अशी :

    पीएम मोदी म्हणाले, जे सदनातून बाहेर गेले आहेत त्यांना जरा विचारा, कच्छथिवू काय आहे आणि ते कुठे आहे??, हे द्रमुक सरकार, त्यांचे मुख्यमंत्री मला पत्र लिहितात, मोदीजी कच्छथिवू भारतात परत आणा. तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या मधल्या भागात ते एक बेट आहे. पण ते दुसऱ्या देशाला कोणी दिले. तो मां भारतीचा भाग नव्हता का?? इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली ही घोडचूक झाली.

    मोदींनी इंदिरा गांधींची घोडचूकच लोकसभेत उघड केली. कच्छथिवू परिसरात थोरियम, मोनाझाईट यांचा प्रचंड साठा आहे. आज त्या परिसरावर श्रीलंकेमार्फत चीनचे “नियंत्रण” आहे. चीनच्या अनेक प्रकल्पांमध्ये तिथल्या साठ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आहे. देशातल्या “फर्स्ट फॅमिलीने” चीनच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या विस्तारवादी धोरणापुढे शरणागती पत्करत कच्छथिवूचा भाग त्यांना “समर्पित” करून टाकला. थोरियम, कच्छथिवू, राम सेतू हे सर्व घटक एकमेकांना जोडलेले आहेत.

    What exactly is Kachthivu that Indira Gandhi blundered about?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी