• Download App
    पश्चिम बंगालमध्ये लसीकरण केंद्रावर तृणमूल नेत्याचे अघोरी कृत्य, पोझ देण्याच्या नादात नर्सकडून लस हिसकावून स्वत:च महिलेला टोचली । West Bengal TMC Leader Asansol Former Dy mayor Gives Vaccine to a Women in Vaccination Camp

    प. बंगालमध्ये लसीकरण केंद्रावर तृणमूल नेत्याचे अघोरी कृत्य, पोझच्या नादात नर्सकडून लस हिसकावून स्वत:च महिलेला टोचली

    Asansol Former Dy mayor : पश्चिम बंगालमध्ये बनावट आयएएस अधिकारी देबंजन देवच्या वतीने अनेक बनावट लसीकरण शिबिरे घेण्याची प्रकरण नुकतेच चर्चेत आले होते. परंतु आता लसीकरणाबाबत असाच एक वाद सुरू झाला आहे. बंगालच्या सत्ताधारी पक्षाच्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्याने स्वत: डॉक्टर नसतानाही एका महिलेला लस दिली आहे. West Bengal TMC Leader Asansol Former Dy mayor Gives Vaccine to a Women in Vaccination Camp


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये बनावट आयएएस अधिकारी देबंजन देवच्या वतीने अनेक बनावट लसीकरण शिबिरे घेण्याची प्रकरण नुकतेच चर्चेत आले होते. परंतु आता लसीकरणाबाबत असाच एक वाद सुरू झाला आहे. बंगालच्या सत्ताधारी पक्षाच्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्याने स्वत: डॉक्टर नसतानाही एका महिलेला लस दिली आहे.

    तृणमूल नेत्याच्या या वर्तनावर भारतीय जनता पक्षाने हल्ला चढवला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि पूर्व बर्दवान जिल्ह्यातील आसनसोल दक्षिणच्या आमदार अग्निमित्रा पाल यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून या तृणमूल नेत्याला लस देण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल विचारला आहे.

    शनिवारी आपल्या ट्विटर हँडलवर अग्निमित्रा पाल यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. यात आसनसोल महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर तबस्सुम आरा लसीकरण शिबिरात गेलेल्या दिसत आहेत. त्यांच्यासमोर एक महिला लस घ्यायला बसली होती. नर्स लस देत असतानाच तृणमूल नेत्या तबस्सुम आरा यांनी त्यांच्या हातातून सिरिंज घेतली आणि स्वत: त्या महिलेला टोचली.

    तबस्सुम यांनी सुई टोचल्यावर त्या जागी कापसाचा बोळाही लावला नाही. लस दिली आणि सुई लगेच काढून टाकली. नर्सनी त्यांना कापूस दिला, मग त्यांनी तो आपल्या हातावर ठेवला.

    हा व्हिडिओ प्रसिद्ध करताना अग्निमित्रा पाल यांनी लिहिले आहे की, तृणमूल कॉंग्रेस लोकांच्या जिवाशी खेळत आहे. ज्या व्यक्तीचा वैद्यकीय क्षेत्राशी काही संबंध नाही, त्या डॉक्टर किंवा नर्स नाहीत, तरीही लोकांना लस देत आहेत. हे भयंकर आहे.

    West Bengal TMC Leader Asansol Former Dy mayor Gives Vaccine to a Women in Vaccination Camp

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!