• Download App
    पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला हिंसाचार; दोन गटात हाणामारी, अनेक वाहने जाळली West Bengal Ruckus during Rama Navami procession in Howrah vehicles torched

    पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला हिंसाचार; दोन गटात हाणामारी, अनेक वाहने जाळली

    घटनास्थळाच्या दृश्यांमध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक वाहने दिसत आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    हावडा : पश्चिम बंगालमधील हावडा येथे आज रामनवमी उत्सवादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि अनेक वाहने जाळण्यात आली. रामनवमीची मिरवणूक परिसरातून गेल्यानंतर लगेचच हिंसाचार उसळला.  घटनास्थळाच्या दृश्यांमध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक वाहने दिसत आहेत. परिसरात दंगल नियंत्रण दलासह तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये पोलिस व्हॅन आणि कारच्या तुटलेल्या काचाही दिसत आहेत. West Bengal Ruckus during Rama Navami procession in Howrah vehicles torched


    छत्रपती संभाजीनगर दंगल : या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर… – देवेंद्र फडणवीस


    दुसरीकडे केंद्राच्या धोरणांविरोधात कोलकाता येथे दोन दिवसीय धरणे आंदोलन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दंगलखोरांना ‘देशाचे शत्रू’ संबोधले आणि इशारा दिला. तृणमूल काँग्रेसने ३० मार्चला रामनवमीच्या दिवशी निषेधाच्या घोषणा केल्याबद्दल भाजपने टीका केली. राज्य विधानसभेतील भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की जे लोक “सनातन संस्कृती” मानतात ते राम जयंती साजरी करतील. या दिवशी सुट्टी जाहीर करण्याऐवजी त्यांनी खोटे दावे करून निषेध जाहीर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, “रामनवमीची मिरवणूक काढणाऱ्यांना माझी विनंती आहे की, ती मिरवणूक कृपया शांततेत काढा. सध्या रमजान सुरू असल्याने मुस्लीम भागातून मिरवणूक काढणं टाळा. रामनवमी शांततेने साजरी करा, हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करू नका. चिथावणी देऊ नका. काही भाजपा नेते म्हणत आहेत की, ते रामनवमीच्या मिरवणुकीत तलवारी आणि चाकू घेऊन फिरतील. पण हा फौजदारी गुन्हा आहे.”

    West Bengal Ruckus during Rama Navami procession in Howrah vehicles torched

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!