• Download App
    पश्चिम बंगालचे मंत्री अखिल गिरींची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंवर अपमानासपद टिपण्णी; महिला आयोगाने लगावली फटकार West Bengal Minister Akhil Giri insulting President Draupadi Murmu

    पश्चिम बंगालचे मंत्री अखिल गिरींची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंवर अपमानासपद टिपण्णी; महिला आयोगाने लगावली फटकार

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार मधील मंत्री आणि तृणामूळ काँग्रेसचे नेते अखिल गिरी यांनी सार्वजनिक जीवनात आपण किती खालच्या दर्जाला जाऊ शकतो याचे उदाहरण पेश केले आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर त्यांनी अपमानास्पद टिप्पणी केली आहे. West Bengal Minister Akhil Giri insulting President Draupadi Murmu

    नंदिग्राम मध्ये शहीद दिवसानिमित्त एका जनसमुदायसमोर बोलताना अखिल गिरी यांनी सुरुवातीला विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यावर टीकास्त्र सोडले. शुभेंदू अधिकारी हे मला मी चांगला दिसत नसल्याचे बोलतात. पण राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसलेल्या बद्दल आपल्याला आदर आहे. पण तुम्हीच पाहा आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात ते!! त्या राष्ट्रपती शोभतात का??, अशी अपमानास्पद टिप्पणी अखिल गिरी यांनी केली. त्याचवेळी त्यांनी शुभेंदू अधिकारी यांना हातपाय तोडण्याची धमकी देखील देऊन टाकली. ममता बॅनर्जी मला शांत बसायला सांगतात म्हणून ठीक आहे, नाहीतर मी शुभेंदू अधिकारी यांचे हात पाय तोडले असते, असे वक्तव्य अखिल गिरी यांनी केले आहे.

    अखिल गिरी यांचे हे वक्तव्य येताच राजकीय वर्तुळात संतापची उसळली. भाजपने ममता बॅनर्जींकडे त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. त्यांच्या या वक्तव्याची केंद्रीय महिला आयोगाने दखल घेऊन त्यांना जाहीर लेखी माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून अखिल गिरी यांची चौकशी आणि तपास करून त्याचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

    द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला प्रथमच आदिवासी समुदायातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी लाभल्या आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्यावर काही नेत्यांनी अपमानास्पद टिपण्णी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या आधी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतले गटनेते अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उल्लेख राष्ट्रपत्नी असा करून अपमान केला होता. त्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती. आता देखील अखिल गिरी यांनाही ते सगळीकडून घेरले गेल्यानंतर उपरती झाली आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विषयी आपल्याला आदर असल्याचे नमूद करून माफी मागितली आहे.

    West Bengal Minister Akhil Giri insulting President Draupadi Murmu

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!