• Download App
    तृणमूल खासदाराची जाहीर धमकी, राज्यपाल धनखड यांचा कार्यकाळ संपताच तुरुंगात करू रवानगी । West Bengal Governor Jagdeep Dhankhar Reply On TMC MP Kalyan Banerjee Controversial Comment

    तृणमूल खासदाराची राज्यपालांना जाहीर धमकी, कार्यकाळ संपताच तुरुंगात डांबणार, राज्यपालांनी जनतेच्या विवेकावर सोडले प्रकरण

    TMC MP Kalyan Banerjee Controversial Comment : पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या काळातील राजकीय वक्तव्ये अजूनही सुरूच आहेत. आता तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. कल्याण बॅनर्जी यांनी नारदा प्रकरणात तृणमूल सरकारचे मंत्री आणि आमदारांना अटक केल्यावरून राज्यपालाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी स्तब्ध झाल्याचे म्हटले आहे. कारण तृणमूलचे खासदाराने आपल्या समर्थकांना त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी मात्र हे प्रकरण बंगालमधील जनतेच्या विवेकावर सोडले आहे. West Bengal Governor Jagdeep Dhankhar Reply On TMC MP Kalyan Banerjee Controversial Comment


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या काळातील राजकीय वक्तव्ये अजूनही सुरूच आहेत. आता तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. कल्याण बॅनर्जी यांनी नारदा प्रकरणात तृणमूल सरकारचे मंत्री आणि आमदारांना अटक केल्यावरून राज्यपालाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी स्तब्ध झाल्याचे म्हटले आहे. कारण तृणमूलचे खासदाराने आपल्या समर्थकांना त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी मात्र हे प्रकरण बंगालमधील जनतेच्या विवेकावर सोडले आहे.

    पश्चिम बंगालच्या हुगळी येथे एका कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपालांविषयी गरळ ओकली. खासदार म्हणाले की, राज्यपालपदावरून जेव्हा ते पायउतार होतील, तेव्हा त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला जाईल. येथेच खासदाराने त्यांना प्रेसिडेंसी जेलमध्ये टाकण्याचेही विधान केले. कल्याण बॅनर्जी यांनी असा दावा केला की, नर्मदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात टीएमसीचे तीन नेते फिरहद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा आणि कोलकाताचे माजी महापौर सोव्हान चटर्जी यांना राज्यपालांच्या सांगण्यावरून अटक करण्यात आली आहे.

    खा. कल्याण बॅनर्जी यांनी हुगळी येथे माध्यमांशी बोलताना म्हटले की, राज्यपालांविरोधात कोणतीही फौजदारी कारवाई होऊ शकत नाही याची मला जाणीव आहे, परंतु राज्यपालांनी जिथे हिंसाचार भडकावला तेथे संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार करण्याची मी सर्वांना विनंती करत आहे. सोबतच ते असेही म्हणाले की, ते ज्या दिवशी राज्यपाल नसतील त्याचदिवशी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवल्या जातील. मग त्यांची रवानगी प्रेसिडेन्सी तुरुंगात करता येईल, येथेच त्यांनी तृणमूलच्या पाच नेत्यांना पाठविले होते.

    West Bengal Governor Jagdeep Dhankhar Reply On TMC MP Kalyan Banerjee Controversial Comment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार

    Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले

    पडळकरांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!