• Download App
    घाटलमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन; मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ न दिल्याचा तृणमूळच्या नेत्यांवर आरोप | West Bengal CPIM workers agitated at Ghatal today, alleged that they were being stopped by TMC workers as they were on their way to cast their vote

    घाटलमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन; मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ न दिल्याचा तृणमूळच्या नेत्यांवर आरोप

    वृत्तसंस्था

    कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूकीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असताना घाटलमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूळ काँग्रेस यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. West Bengal CPIM workers agitated at Ghatal today, alleged that they were being stopped by TMC workers as they were on their way to cast their vote

    मतदारांना मतदान केंद्रापर्यंत तृणमूळ काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊच देत नाहीत, असा आरोप करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले. त्यामुळे घाटलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    पोलीसांना या आंदोलनाची आणि तणावाची माहिती मिळताच काही वेळाने त्यांनी तिथे पोहोचून रस्त्यावरचे जळते टायर हटवून रस्ता मोकळा केला आणि आंदोलकांनाही रस्त्यावरून बाजूला केले. सध्या तेथे मतदान सुरळित चालल्याच्या बातम्या आहेत पण वातावरण तणावपूर्ण आहे.

    बंगालमध्ये संपूर्ण निवडणूकीत तृणमूळ काँग्रेस आणि भाजप यांच्यातच संघर्ष पाहायला मिळत असताना डाव्या पक्षांच्या आंदोलनाची आणि संघर्षाची बातमी बऱ्याच दिवसांनी आली आहे. बंगालच्या ग्रामीण भागात डाव्या पक्षांचे केडर आहे पण तृणमूळच्या गेल्या १० वर्षांच्या राजवटीत आणि २०१४ नंतर भाजपच्या उदयातून डाव्यांच्या केडरला धक्का बसून ते झाकोळले गेले आहे.

    डावी आघाडी आणि काँग्रेस एकत्र येऊन तृणमूळ काँग्रेसशी लढत देत आहे. पण प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांचे अस्तित्व तृणमूळ काँग्रेस आणि भाजप यांच्या तुलनेत नगण्यच दिसत आहे.

    West Bengal CPIM workers agitated at Ghatal today, alleged that they were being stopped by TMC workers as they were on their way to cast their vote

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट