CM Mamata Will Contest By-Election From Bhawanipore : पश्चिम बंगालमधून मोठी बातमी आली आहे. तृणमूलचे आमदार शोभनदेव चटर्जी यांनी येथील भवानीपूर मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शुक्रवारी (21 मे) सभापती बिमान बॅनर्जी यांना आपला राजीनामा सादर केला. त्यांच्या जागी ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्याच वेळी पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी म्हणाले, “मी चॅटर्जी यांना विचारले की, त्यांनी स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय राजीनामा दिला आहे का? त्यांच्या उत्तराने मी समाधानी आहे आणि मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.” West Bengal CM Mamata Will Contest By-Election From Bhawanipore Her Traditional Seat, Sobhandeb Chatterjee Resigned Today
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमधून मोठी बातमी आली आहे. तृणमूलचे आमदार शोभनदेव चटर्जी यांनी येथील भवानीपूर मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शुक्रवारी (21 मे) सभापती बिमान बॅनर्जी यांना आपला राजीनामा सादर केला. त्यांच्या जागी ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवणार आहेत.
त्याच वेळी पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी म्हणाले, “मी चॅटर्जी यांना विचारले की, त्यांनी स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय राजीनामा दिला आहे का? त्यांच्या उत्तराने मी समाधानी आहे आणि मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.”
सहा महिन्यांच्या आत निवडून येणे बंधनकारक
आमदार नसतानाही मुख्यमंत्रिपदी असलेल्या ममतांना सहा महिन्यांच्या आत निवडून यावे लागणार आहे. यामुळे यावेळी त्यांनी आपला पारंपरिक मतदारसंघ निवडला. भवानीपूरमधून ममता बॅनर्जी यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढलेल्या आहेत. 2011च्या विधानसभा निवडणुकीत मध्ये येथे तृणमूलच्या सुब्रत यांचा विजय झाला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर ममतांनी पोटनिवडणूक लढली होती. यात त्या विजयी झाल्या होत्या. 2016 मध्येही त्यांचा येथूनच विजय झाला होता. आता येथून तृणमूल आमदार शोभनदेव चटर्जी यांनी राजीनामा देऊन ममतांसाठी जागा रिकामी केली आहे.
काय म्हणाले शोभनदेव चटर्जी?
सभापतींकडे राजीनामा सादर केल्यानंतर चॅटर्जी पत्रकारांशी बोलले. यादरम्यान ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री भवानीपूरमधून दोनदा विजयी झालेल्या आहेत. पक्षातील सर्व नेत्यांनी चर्चा केली आणि जेव्हा मला हे समजले की, त्यांना येथून निवडणूक लढवायची आहे, तेव्हा मला वाटले की मी माझी जागा सोडावी, माझ्यावर कोणताही दबाव नाही. सरकार चालवण्याचे धाडस दुसर्या कोणाकडेही नाही. मी त्यांच्याशी बोललो. ही त्यांची जागा होती, मी फक्त तिचे रक्षण करत होतो.’
नंदिग्राममध्ये भाजपच्या सुवेंदु अधिकारींनी चारली होती धूळ
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांनी नंदिग्राम मतदारसंघातून पराभव केला होता. नंदिग्रामची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. ममतांनी अत्यंत आक्रमकपणे प्रचार राबवला होता, तरीही त्यांचा सुवेंदु अधिकारी यांच्याकडून काही हजार मतांनी पराभव झाला.
West Bengal CM Mamata Will Contest By-Election From Bhawanipore Her Traditional Seat, Sobhandeb Chatterjee Resigned Today
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना काळात RBI ची केंद्र सरकारला मोठी मदत, सरप्लस अमाउंटमधून 99,122 कोटी हस्तांतरणाचा बोर्डाची मंजुरी
- अँटिलिया केसमधील आरोपी एपीआय काझीही पोलीस सेवेतून बडतर्फ, पुरावे मिटवल्याचा आरोप
- खळबळजनक : चीनच्या लॅबमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती, लीक झाल्यानेच जगभरात प्रसार, अमेरिकी शास्त्रज्ञाचा संशोधनपर लेख
- चिपको आंदोलनाचे प्रणेते, स्वातंत्र्यसेनानी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन, वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Narada Sting Case : तृणमूल काँग्रेसचे चारही नेते नजरकैदेत, कोलकाता हायकोर्टाचा निर्णय