• Download App
    बंगालमध्ये पाचव्या टप्प्यात महिलांचे रेकॉर्ड मतदान; सायंकाळी ५.४५ आकडा ७८.३६ टक्के, आधीच्या ४ टप्प्यांच्या तुलनेत शांततेत मतदान West Bengal 5th phase election concludes with high turnout of women voters

    बंगालमध्ये पाचव्या टप्प्यात महिलांचे रेकॉर्ड मतदान; सायंकाळी ५.४५ आकडा ७८.३६ टक्के, आधीच्या ४ टप्प्यांच्या तुलनेत शांततेत मतदान

    वृत्तसंस्था

    कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात ४५ मतदारसंघांमध्ये आधीच्या चार टप्प्यांच्या तुलनेत शांततेत पार पडले. या टप्प्यात महिलांचे रेकॉर्ड़ मतदान झाल्याचे दिसून आले. सायंकाळी ५.४५ वाजताच्या आकडेवारीनुसार ७८.३६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. शेवटच्या दोन तासात ही टक्केवारी ३ ते ५ टक्यांनी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. West Bengal 5th phase election concludes with high turnout of women voters

    दक्षिण परगणा जिल्ह्यातील देगांगा मतदारसंघात गोळीबाराच्या घटनेची बातमी आहे. पण ती वगळता इतरत्र काही अपवाद वगळता शांततेत मतदान झाल्याची बातमी आहे. ४५ मतदारसंघांमध्ये १५७८९ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. समशेरगंज आणि जांगीपूर मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या निधनामुळे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे.



    बिधननगर परिसरात तृणमूळ काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याच्या बातम्या होत्या. पण सुरक्षा दलांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मतदानात अडथळा आला नाही. तेथे थोड्याच वेळानंतर मतदान सुरळित सुरू होऊन पार पडले. तृणमूळ काँग्रेसचे खासदार सुजित बोस आणि भाजपचे उमेदवार सव्यसाची दत्ता यांनी घटनास्थळी भेट दिली आणि एकमेकांविरोधात तक्रारी केल्या.

    सिलिगुडी आणि नदिया जिल्ह्यातील शांतिपूर मतदारसंघांमध्ये तृणमूळच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय दलांवर मतदारांना केंद्रावरून परत पाठविल्याचा आरोप केला. पण केंद्रीय दलांनी तो फेटाळून लावला आहे.

    West Bengal 5th phase election concludes with high turnout of women voters

    Related posts

    Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला