• Download App
    गुजरातमध्ये आता लव्ह जिहादविरोधी कायदा; गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांची घोषणा।We're going to make amendments to Gujarat Freedom of Religion Act, 2003, Gujarat Home Minister Pradipsinh Jadeja

    गुजरातमध्ये आता लव्ह जिहादविरोधी कायदा; गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांची घोषणा

    वृत्तसंस्था

    गांधीनंगर : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांपाठोपाठ आता गुजरातमध्ये देखील लव्ह जिहाद विरोधातील कायदा करण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी ही घोषणा केली. We’re going to make amendments to Gujarat Freedom of Religion Act, 2003, Gujarat Home Minister Pradipsinh Jadeja

    गुजरात धार्मिक स्वातंत्र्य कायदा २००३ मध्ये दुरूस्ती करून नवा कायदा तयार करण्यात येईल. आज विधानसभेत तसे विधेयक मांडले जाईल. कोणत्याही हिंदू मुलीला परधर्माच्या मुलाने फसवून किंवा अमिष दाखवून विवाह करण्यास प्रतिबंध करणारा आणि तसे केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मूभा देणाऱ्या तरतूदी या विधेयकात असतील, असे प्रदीपसिंह जडेजा यांनी स्पष्ट केले.



    लव्ह जिहादच्या घटना देशभर वाढत असताना त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अनेक भाजपशासित राज्यांनी हा कठोर कायदा आधीच मंजूर करून अस्तित्वात आणला आहे. उत्तर प्रदेशात अँटी रोमिओ स्क्वाडने लव्ह जिहादच्या अनेक केसेस पुढे आणून सोडविल्या आहेत.

    केरळ विधानसभेच्या निवडणूकीत लव्ह जिहादचा मुद्दा खूप तापलाय. यात हिंदू समाजाला ख्रिश्चन समाजाचीही साथ मिळाली आहे. भाजपने केरळमध्ये आपल्या जाहीरनाम्यात लव्ह जिहाद विरोधातील कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे.

    We’re going to make amendments to Gujarat Freedom of Religion Act, 2003, Gujarat Home Minister Pradipsinh Jadeja

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो