• Download App
    सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्माचे नागरिकांना आवाहन; म्हणाला - "लस घ्या अन् कोरोनाला पळवा."|Well known cricketer Rohit Sharma appeals to citizens; Said - "Get vaccinated and escape Uncorona."

    सुप्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्माचे नागरिकांना आवाहन; म्हणाला – “लस घ्या अन् कोरोनाला पळवा.”

    जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा प्रशासनाकडून सर्व पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु आहेत.Well known cricketer Rohit Sharma appeals to citizens; Said – “Get vaccinated and escape Uncorona.”


    विशेष प्रतिनिधी

    रायगड : रोहित शर्मा काल खाजगी कामानिमित्त अलिबाग येथे आला होता. यावेळी रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनो लस घ्या अन् कोरोनाला पळवा, असे आवाहन प्रसिध्द क्रिकेटपटू रोहित शर्माने केले आहे.

    याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.यावेळी अलिबाग तहसिलदार मीनल दळवी, सारळ मंडळ अधिकारी पी.बी मोकल यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते.



    सध्या कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांसाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. त्यादृष्टीने सध्या सर्वत्र प्रशासनातर्फे लसीकरणावर जोर दिला जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा प्रशासनाकडून सर्व पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

    तसेच लासिकरणाबंत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रामुख्याने विविध सुप्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री यांच्या व्हिडीओ चित्रफित माध्यमाचा वापर करून नागरिकांना लसीकरणाबाबतचे महत्व सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

    लस घेण्याबाबत आवाहनही केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रिकेटपटू रोहित शर्मा याने अलिबाग येथे नागरिकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

    Well known cricketer Rohit Sharma appeals to citizens; Said – “Get vaccinated and escape Uncorona.”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती

    लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला