… नवीन संसद भवन भव्य दिसत आहे, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर: नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी सांगितले की, नवीन संसद भवन स्वागतार्ह आहे आणि ते भव्य दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षासह अनेक विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले असताना त्यांनी हे भाष्य केले आहे. अब्दुल्ला म्हणाले की, जेव्हा ते लोकसभेचे सदस्य होते, तेव्हा त्यांचे अनेक सहकारी नवीन आणि चांगल्या संसद भवनाच्या गरजेबद्दल बोलत असत. Welcome to the new parliament building it was needed Omar Abdullahs statement during opposition protests
ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “याच्या उद्घाटनाबाबतचा गोंधळ काही क्षणांसाठी बाजूला ठेवूया, हे (नवीन संसद भवन) स्वागतार्ह आहे. जुन्या संसद भवनाचे अद्भुत योगदान आहे, परंतु तेथे काही वर्षे काम करणाऱ्या व्यक्ती म्हणून, आपल्यापैकी बरेच जण नवीन आणि चांगल्या संसद भवनाच्या गरजेबद्दल आपापसात बोलले आहेत.’’
ते म्हणाले, ‘देर आये दुरुस्त आये’, आणि हे (नवीन संसद भवन) भव्य दिसत आहे. काँग्रेस, डावे, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षासह १९ विरोधी पक्षांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचाही समावेश आहे.
Welcome to the new parliament building it was needed Omar Abdullahs statement during opposition protests
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनात ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’ची झलक; महाराष्ट्रातून सागवान, राजस्थानचे संगमरवर तर उत्तर प्रदेशातून कार्पेट!
- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
- मोदी सरकारची 9 वर्षे : काँग्रेसचे 9 प्रश्न; सरकारचे 9 निर्णय!!
- सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..