मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान शिवराज सिंह चौहान हातात माईक धरत ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ हे गाणे गाताना दिसले. We will not leave this friendship: Shivraj-Kailash Sholay’s famous song was seen singing, video went viral
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : बॉलीवूड ब्लॉकबस्टर चित्रपट शोले मधील ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ हे गाणे मित्रांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. बऱ्याचदा जवळचे मित्र हे गाणे गुणगुणताना दिसतात, पण आता या गाण्याने राजकीय वर्तुळातही स्थान मिळवले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय शोलेच ‘ ये दोस्ती हम नही छोडेंगे ‘ गाण गाताना दिसले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान शिवराज सिंह चौहान हातात माईक धरत ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ हे गाणे गाताना दिसले.
त्याचवेळी कैलाश विजयवर्गीय हातात हात धरून हे गाणे गुणगुणत राहिले. जेव्हा गाण्याची पहिली अंतरा संपली तेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्याचवेळी पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्ते टाळ्या वाजवू लागले.
We will not leave this friendship: Shivraj-Kailash Sholay’s famous song was seen singing, video went viral
महत्त्वाच्या बातम्या
- सेक्स गुलाम बनविण्यासाठी तालीबान अफगणिस्थानातील घराघरात मुली आणि विधवांचा घेतेय शोध
- अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा
- शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
- Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध