वृत्तसंस्था
हिरोशिमा : हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्यात चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी तसेच त्या देशाचा वर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी तयार झालेल्या संरक्षण चतुष्कोन अर्थात “क्वाड” देशांची 2024 ची शिखर बैठक भारतात आयोजित करण्यात आनंद होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान मधल्या हिरोशिमा मध्ये झालेल्या “क्वाड”च्या शिखर बैठकीत जाहीर केले. हिंदी आणि पॅसिफिक महासागरात खुले व्यापारी वातावरण राहावे यासाठी भारताच्या पुढाकारातून प्रयत्न करण्याची ग्वाही देखील पंतप्रधान मोदींनी दिली. We will be happy to host Quad Summit in India in 2024, says PM Modi in Japan
ऑस्ट्रेलियातली रद्द झालेली “क्वाड समिट” जपानमधल्या हिरोशिमात झाली. त्यात पंतप्रधान मोदींसह ज्यो बायडेन सहभागी झाले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उपस्थिती विषयी असमर्थता दर्शवल्याने ऑस्ट्रेलियातली रद्द झालेली नियोजित “क्वाड समिट” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने आज जपानमधल्या हिरोशिमात झाली. या बैठकीला मोदी यांच्या आग्रहातून ज्यो बायडेन उपस्थित राहिले.
अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या या चार देशांनी एकत्र येऊन संरक्षण चतुष्कोन तयार केला आहे. त्यालाच “क्वाड” असे म्हणतात. हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यामध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी आणि चिनी वर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी “क्वाड” संघटना कार्यरत आहे. या क्वाडची 2023 शिखर बैठक ऑस्ट्रेलियात नियोजित होती. परंतु अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी उपस्थिती विषयी असमर्थता दर्शवल्याने ती रद्द झाली होती.
पण जपानच्या हिरोशिमांमध्ये प्रगत जी 7 देशांचे प्रमुख जमले आहेत. त्याच बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण होते. ते जी 7 च्या बैठकीला हजर राहिलेच, पण त्याचबरोबर रद्द झालेली “क्वाड समिट” घ्यायचाही त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे जपानचे पंतप्रधान हिडो किशीदा यांनी ताबडतोब “क्वाड समिट” हिरोशिमात आयोजित केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, जपानचे पंतप्रधान हिडो किशीदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज उपस्थित राहिले.