वृत्तसंस्था
लखनौ : मी किंवा माझा मुलगा दोघेही घटनास्थळी उपस्थित नव्हतो, तसे पुरावे आमच्याकडे आहेत, असे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे दोन दिवसांपूर्वी उफाळून आलेल्या हिंसाचार आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत ते बोलत होते. We have evidence to prove that neither I nor my son were present at spot: Ajay Mishra Teni on Lakhimpur Kheri violence
लखीमपूर खेरीच्या टिकुनिया येथे रविवारी झालेल्या हिंसाचारासाठी शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी नेत्यांनी आरोप केला होता की, मंत्र्याच्या मुलाच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या वाहनांनी आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले. या हिंसाचारानंतर उद्रेक झाला आणि ४ शेतकऱ्यांव्यतिरिक्त, काफिल्यात सामील असलेले इतर चार लोकही मारले गेले.
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी म्हणाले, आम्ही कोणत्याही तपास यंत्रणेला सामोरे जाण्यास तयार आहोत. गुन्हेगार, ज्यांनी या घटनेची योजना आखली आहे त्यांना सोडले जाणार नाही.
अजय मिश्रा टेनी म्हणाले, घटना कशी घडली ? याची आम्हाला कल्पना नाही. माहिती आणि व्हिडिओच्या आधारे, कारमधून बाहेर काढल्यानंतर चालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे. जर त्या ठिकाणी माझा मुलगा असता तर तो नक्कीच मारला गेला असता. हजारो लोकांच्या गर्दीवर गाडी घातली असती तर त्या ठिकाणाहून बाहेर पडणे अशक्य आहे. त्यामुळे या घटनेशी माझा आणि माझ्या मुलाचा कोणताही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.
We have evidence to prove that neither I nor my son were present at spot: Ajay Mishra Teni on Lakhimpur Kheri violence
महत्त्वाच्या बातम्या
- Drugs Case : शर्लिन चोप्राचे शाहरुख खानवर गंभीर आरोप, म्हणाली- बॉलीवूड स्टार्सच्या बायका त्यांच्या पार्ट्यांमध्ये ‘व्हाइट पावडर’ घ्यायच्या
- थॉमस नावाच्या ‘हॅकर’मुळे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप झाले होते ठप्प, आता अमेरिकेची एफबीआय मागावर
- Priyanka Gandhi Arrested : प्रियांका गांधींना अटक, शांतता भंग आणि कलम -144 चे उल्लंघन केल्याचा आरोप
- प्रियांका गांधी केंद्रस्थानी येत असल्याने अखिलेश यादव अस्वस्थ; निघाले उत्तरप्रदेशच्या रथयात्रेवर!!
- ‘तुम्ही शांततेची चर्चा करता, तिकडे तुमचे पंतप्रधान ओसामाला शहीद म्हणतात’ भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला फटकारले ।