• Download App
    कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत होऊन त्याची सूचना राजपत्रात प्रसिध्द होत नाही, तोपर्यंत आमचा मोदी सरकारवर विश्वास नाही ; राकेश टिकैत | We do not trust the Modi government until the bill to repeal the Agriculture Act is passed in both the Houses of Parliament and its notice is published in the Gazette; Rakesh Tikait

    कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत होऊन त्याची सूचना राजपत्रात प्रसिध्द होत नाही, तोपर्यंत आमचा मोदी सरकारवर विश्वास नाही ; राकेश टिकैत

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांनी शेतकरी कायद्या विरुद्ध अांदाेलन केले. शेवटी गुरू नानक जयंती दिवशी हे कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. हा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करूनच तयार केलेला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेमध्ये हे तिन्ही कायदे रद्द करण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे.

    We do not trust the Modi government until the bill to repeal the Agriculture Act is passed in both the Houses of Parliament and its notice is published in the Gazette; Rakesh Tikait

    मात्र सर्व विरोधी पक्षनेते यावर टिका करताना दिसले. कायदे सुरू करण्याची आणि कायदे रद्द करण्याची ही कोणती पद्धत आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. कोणत्याही चर्चेविना हा कायदा रद्द करण्याचे विधेयक मंजूर करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्ष चर्चा करण्यासाठी का घाबरत आहे? असा प्रश्न विरोधकांनी यावेळी मांडला


    Farmer Protest : राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा! म्हणाले – आम्हाला जबरदस्तीने हटवले तर सरकारी कार्यालयांना गल्ला मंडई बनवू


    भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टीकैत यांनी देखील या गोष्टींवर टीका करताना म्हटले आहे की, संसदेतील दोन्ही सभागृहात नवी कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक संमत होऊन त्याची सूचना राजपत्रात प्रसिध्द होत नाही, तोपर्यंत आमचा मोदी सरकारच्या शब्दावर विश्वास बसणार नाही. शेतकरी आज संसदेवर ट्रॅक्टर मोर्चाही काढणार आहेत. असे त्यांनी ठामपणे सांगितले होते.

    We do not trust the Modi government until the bill to repeal the Agriculture Act is passed in both the Houses of Parliament and its notice is published in the Gazette; Rakesh Tikait

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Andaman and Nicobar Islands : मान्सून अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला 27 मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता

    CJI Sanjiv Khanna’ : कायदेशीर व्यवसायात सत्याचा अभाव त्रासदायक आहे; निरोप समारंभात CJI संजीव खन्ना यांची प्रतिक्रिया

    Operation sindoor मधून काय मिळवले??, पाकिस्तानात “पंजाबी हार्ट लँड” वर प्रहार केले; करण थापरला ठणकावून शशी थरूर यांनी गप्पा केले!!