• Download App
    आम्ही शांततेच्या बाजुने, युध्द संपविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहनWe are on the side of peace, Prime Minister Narendra Modi's call to end the war

    आम्ही शांततेच्या बाजुने, युध्द संपविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

    रशिया आणि युक्रेनमधील युद्धात कोणीही जिंकणार नाही. चचेर्तून समस्येवर तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास आहे. आम्ही युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर चर्चा केली. आम्ही शांततेच्या बाजूने आहोत आणि युद्ध संपवण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.We are on the side of peace, Prime Minister Narendra Modi’s call to end the war


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :रशिया आणि युक्रेनमधील युद्धात कोणीही जिंकणार नाही. चचेर्तून समस्येवर तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास आहे. आम्ही युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर चर्चा केली. आम्ही शांततेच्या बाजूने आहोत आणि युद्ध संपवण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

    जर्मनीचे चांसलर ओल्फ स्कोल्झ यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. पंतप्रधान तीन दिवसांच्या युरोप दौºयावर आहेत. दोन्ही देशांनी शत्रुत्व संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संवाद आणि मुत्सद्देगिरीने हे प्रकरण सोडवले पाहिजे.


    Prime Minister Narendra Modi ! पुणे मेट्रोच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर


    जोपर्यंत युक्रेनबाबत भारताचा प्रश्न आहे, भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. दोन्ही देशांनी वैर संपवून संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून चर्चेच्या टेबलावर यावे. असे आम्ही सुरुवातीपासून म्हणत आलो आहोत, असे रविवारी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी रशिया-युक्रेन युद्धावर भारताची बाजू घेताना म्हटले.

    रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर भारत रशिया आणि युक्रेनला युद्ध थांबवून चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन करीत आहे. रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताने अनेक जागतिक व्यासपीठांवरून भूमिका मांडली आहे. आजही भारत आपल्या भूमिकेवर कायम आहे. हा प्रश्न दोन्ही देशांमधील संवादातून सोडवला गेला पाहिजे. भारताच्या जागतिक मित्र राष्ट्रांनाही रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताचे मत माहीत आहे. त्यांनी भारताच्या बाजूचे कौतुक केले आहे.

    We are on the side of peace, Prime Minister Narendra Modi’s call to end the war

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार