वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय ईडीने नोटीस पाठवल्या बरोबर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे ईडीच्या दिल्लीच्या कार्यालयात चौकशी आणि तपासासाठी दाखल झाले असून आपण न घाबरता ईडीच्या कोणत्याही चौकशी आणि तपासाला सामोरे जायला तयार आहोत, असे अभिषेक बॅनर्जी यांनी दिल्लीच्या कार्यालयासमोर पत्रकारांना सांगितले.We are facing an ED inquiry; Mamata’s nephew MP Abhishek Banerjee arrives at the ED office in Delhi
कोळसा घोटाळा किंवा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आपला काहीही संबंध नाही. हे मी आधीच स्पष्ट केले आहे. ईडी तपास संस्थांचे अधिकारी चौकशी करण्याचे त्यांचे काम करत आहेत. एक नागरिक म्हणून त्यांना उत्तरे देणे हे माझे कर्तव्य आहे. मी कोणत्याही घोटाळ्यात अडकलेले नाही, असे अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
एकीकडे खासदार अभिषेक बॅनर्जी हे धीटपणे किडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे ठाकरे – पवार सरकार मधील राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीला लूकआऊट नोटीस काढावी लागली आहे.
या विषयावर सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगत असून अनेकांनी बंगाल विरुद्ध महाराष्ट्र अशीही “लढत” लावून दिली आहे. बंगाल दिल्ली समोर जाऊन टक्कर घेतोय आणि महाराष्ट्र नुसत्या दिल्लीपुढे न झुकण्याच्या बाता करतोय, अशी खिल्ली अनेक नेटिझन्सनी सोशल मीडियावर उडविली आहे.
We are facing an ED inquiry; Mamata’s nephew MP Abhishek Banerjee arrives at the ED office in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- SAMNA : RSS राष्ट्रीय बाण्याची संघटना-तालिबानशी तुलना आम्हाला मान्य नाही ; संजय राऊतांनी जावेद अख्तरांच्या ‘धर्मनिरपेक्षतेचे’ गोडवे गात प्रेमाणे खडसावलं
- कोळसा घोटाळा : तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर, म्हणाले- आरोपी सिद्ध झाल्यास फासावर लटकेन ।
- सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर ताशेरे, न्यायालयाच्या निर्णयांचा सन्मान होत नाही, आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका!
- Dhananjay Munde : वो कौन थी/था ? करुणा मुंडे प्रकरणात धक्कादायक षडयंत्र ; गाडीत पिस्तूल ठेवणारी अज्ञात महिला ? VIDEO व्हायरल