विशेष प्रतिनिधी
केरळ : डिसेंबरमध्ये चांगली थंडी पडलेली असते. या काळामध्ये बरेच लोक प्रवासासाठी बाहेर पडतात. केरळ हे पर्यटकांचे आवडते स्थान आहे. केरळमधील वॉटर बोट हे तेथील एक मोठे आकर्षण आहे.
Water boat service resumed in Kerala for Christmas and New Year
मागील जवळपास एक वर्षापासून या सर्व बोट सर्व्हिसेस बंद होत्या. तर आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या हंगामासाठी या बोट पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. कोट्यायाम आणि कुमाराकोम या ठिकाणी पून्हा पर्यटन व्यवसाय जोरात सुरू होईल असे वाटत असताना पुन्हा ओमिक्रॉनचे सावट आले आहे.
अनेक पर्यटकांनी केलेले बुकिंग देखील कॅन्सल केलेले आहे. युरोप मधील बऱ्याच देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढलेला आहे. त्यामुळे केरळमध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांची अनुपस्थिती ही देखील पर्यटन व्यवसायासाठी एक मोठी धक्कादायक गोष्ट आहे.
लवकरच कोरोना महामारी संपावी आणि परिस्थिती पूर्ववत व्हावी अशी इच्छा बोट मालकांनी व्यक्त केली आहे.
Water boat service resumed in Kerala for Christmas and New Year
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
- ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार
- प्रियांका गांधी म्हणाल्या, देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे!!; पण सुनील शास्त्री यांचा प्रतिसाद का नाही??