• Download App
    वाजपेयी हे नेहरू जमान्याचे प्रॉडक्ट; तर मोदींना नेहरूंची विरासत खतम करायचीय; जयराम रमेश यांचे शरसंधानWatch Solar Eclipse, Anand Modi Wants To End Nehru's Legacy; Jairam Ramesh's Sharasandhanluta but be careful, stay safe

    वाजपेयी हे नेहरू जमान्याचे प्रॉडक्ट; तर मोदींना नेहरूंची विरासत खतम करायचीय; जयराम रमेश यांचे शरसंधान

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेचे वर्णन करताना काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घसरले. त्याचवेळी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाची स्तुती करून वाजपेयी हे नेहरू जमान्याचे प्रॉडक्ट होते, तर नरेंद्र मोदींना नेहरूंची विरासत खतम करायची आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे. Watch Solar Eclipse, Anand Modi Wants To End Nehru’s Legacy; Jairam Ramesh’s Sharasandhanluta but be careful, stay safe

    काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची माहिती देण्यासाठी जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. गेल्या 8 वर्षांमध्ये भारतात असहिष्णु वातावरण तयार केले गेले आहे. देशाची लोकशाही धोक्यात आहे. आज आम्हाला इंग्लंड सारख्या देशाकडून अनेकता वादाची शिकवण घ्यावी लागते ही दुर्दैव आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचार पद्धतीच वेगळी आहे. त्यांना देशाची अनेकता मान्य नाही. त्यांना एककल्ली कारभार करायचा आहे.

    पण वाजपेयींचे तसे नव्हते. वाजपेयी हे नेहरू जमान्याचे प्रॉडक्ट होते. त्यांच्या काळात एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती बनले, तर काँग्रेसने जाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद यांना राष्ट्रपती बनवले होते. राजस्थानात बरकतउल्ला खान आणि महाराष्ट्रात अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री झाले पण आता देशातील अनेकतेतून एकदा हे तत्वच संपवले जात आहे असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.

    त्याचवेळी त्यांनी भारत जोडो यात्रा यात्रेला दक्षिणेत उत्तम प्रतिसाद मिळाला पण काँग्रेसचा तिथल्या प्रादेशिक पक्षांची संघर्ष आहे याकडे लक्ष वेधले केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची तेलंगणा तेलंगणा राष्ट्र समितीची आंध्रमध्ये तेलगू रेशम आणि वायसर काँग्रेस यांच्याशी तसेच कर्नाटकात जेडीएसशी संघर्ष असल्याचे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. एक प्रकारे जयराम रमेश यांनी आपल्या वक्तव्यातून विरोधी पक्षांच्या ऐकायलाच सुरुंग लावला आहे.

    Watch Solar Eclipse, Anand Modi Wants To End Nehru’s Legacy; Jairam Ramesh’s Sharasandhanluta but be careful, stay safe

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!