Corona Care Coaches : कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारतीय रेल्वेनेही आपला वाटा उचलला आहे. भारतीय रेल्वेने राज्यांच्या वापरासाठी जवळपास 4000 कोरोना केअर कोच तयार केले आहेत. यात जवळपास 64000 बेड आहेत. यांपैकी आतापर्यंत 169 कोरोना केअर कोच राज्यांना वापरासाठीदेखील सोपविण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात या कोरोना केअर कोचचा वापरही सुरू झाला आहे. दिल्लीत 75 कोरोना केअर कोच तयार करण्यात आले आहेत. यांत तब्बल 1200 बेडची क्षमता आहे. 50 कोच शकुरबस्ती आणि 25 कोच आनंद विहारमध्ये लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये 57 कोरोना बाधित कोरोना केअर कोचचा वापर करत आहेत. यांतील एकाला शिफ्ट करण्यात आले आहे. तसेच 322 बेड अद्यापही उपलब्ध आहेत. नागपूर जिल्ह्यातही कोरोना केअर कोच लावण्यात येत आहेत. WATCH Indian Railway Launches 4000 Corona Care Coaches With 64000 beds
महत्त्वाच्या बातम्या
- लसीसाठी नोंदणी करूनही का मिळत नाहीये स्लॉट?, केव्हा मिळेल? कोविन प्रमुखांनी दिली ही उत्तरे, वाचा सविस्तर…
- सीरमने कमी केली कोव्हिशिल्ड लसीची किंमत, आता राज्यांना 400 ऐवजी 300 रुपयांत मिळणार डोस
- Corona Vaccine Registration : नोंदणीच्या वेळी क्रॅश झालेले कोविन सर्व्हर पुन्हा सुरू, आरोग्य सेतूने दिले स्पष्टीकरण
- India Fights Back : पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीस पंतप्रधान मोदींची मंजुरी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 18 ते 44 वयापर्यंत मोफत लसीकरणाची घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय