वृत्तसंस्था
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर युगांडा आणि मोझांबिकच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, काल त्यांनी मोझांबिकच्या परिवहन मंत्र्यांसोबत ट्रेनमध्ये प्रवास केला. या भेटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे परराष्ट्र मंत्री मोझांबिकमध्ये मेड इन इंडिया ट्रेनमधून प्रवास करत होते.WATCH External Affairs Minister Jaishankar travels on ‘Made in India’ train in Mozambique, local ministers praise Indian Metro
ट्विटरवर व्हिडिओ केला शेअर
जयशंकर यांनी त्यांच्या स्वत:च्या ट्विटर हँडलवर या भेटीचा व्हिडिओही शेअर केला आहे. मोझांबिकचे परिवहन मंत्री मॅट्युस मॅगाला यांच्यासह मापुतो ते मचावा या मार्गावर ‘मेड इन इंडिया’ ट्रेनमध्ये प्रवास करणे खूप आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत सहभागी झाल्याबद्दल मंत्र्यांनी RITES चे CMD राहुल मित्तल यांचेही कौतुक केले. RITES ही भारतातील रेल्वे उत्पादन कंपनी आहे.
मंत्र्याने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये, दोघे रेल्वे नेटवर्कचा विस्तार, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि जलमार्ग कनेक्टिव्हिटीबद्दल बोलताना दिसले. यावेळी जयशंकर त्यांनी मोझांबिकच्या मंत्र्यांना भारतीय मेट्रोबद्दल सांगितले. ते म्हणाले की, भारतातील मेट्रो देशाच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते.
रेल्वे नेटवर्क विस्तारावर चर्चा
जयशंकर मोझांबिकन मंत्र्यासोबत प्रवास करत असताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चाही केली. एस. जयशंकर यांनी निदर्शनास आणून दिले की दोघांनी ट्रेन नेटवर्क, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि जलमार्ग कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्यासाठी भारताच्या भागीदारीबद्दल चर्चा केली.
मंदिरालाही दिली भेट
एस. जयशंकर तीन दिवसांच्या मोझांबिक दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी मोझांबिकच्या संसदेच्या अध्यक्षांचीही भेट घेतली. 13 एप्रिल रोजी त्यांनी या भेटीला सुरुवात केली, ही भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची पहिली भेट होती.
या भेटीदरम्यान एस. जयशंकर यांनी देशातील भारतीय समुदायाशी संवाद साधला आणि एका मंदिरालाही भेट दिली.
WATCH External Affairs Minister Jaishankar travels on ‘Made in India’ train in Mozambique, local ministers praise Indian Metro
महत्वाच्या बातम्या
- Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांचे निळ्या रंगाशी नेमके नाते काय?
- राज्यघटनेच्या शिल्पकाराला, कोट्यवधीसाठी महामानव असलेल्या डॉ. आंबेडकरांना ४ दशके उशीरा
- राहुल गांधी – पवारांसह सर्व विरोधकांच्या तोंडी एकीची भाषा, पण मग बेकी होतीये तरी का??
- विधवांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्द वापरण्यावरून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर आमनेसामने…