तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि अन्य १२ जणांचा मृत्यू झाल्याने देशात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर आज हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यामुळे या घटनेचे कारण बऱ्याच अंशी समजू शकते. एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, जो काल दुपारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर Mi-17 V5 च्या अपघातापूर्वीचा आहे. WATCH : Bipin Rawat’s helicopter flying in thick fog, video shoot by locals before crash
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि अन्य १२ जणांचा मृत्यू झाल्याने देशात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर आज हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यामुळे या घटनेचे कारण बऱ्याच अंशी समजू शकते. एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, जो काल दुपारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर Mi-17 V5 च्या अपघातापूर्वीचा आहे.
मात्र, या व्हिडिओला हवाई दलाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. या व्हिडीओमध्ये हेलिकॉप्टर वरून उडत असल्याचा आवाज ऐकू येतो आणि अचानक तो बंद झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक अचानक थांबतात आणि त्याकडे पाहू लागतात. एक व्यक्ती विचारते – काय झाले? तो पडला की क्रॅश झाला? दुसरी म्हणे – होय!
सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 लष्करी अधिकार्यांचा बुधवारी कोईम्बतूरमधील सुलूर एअर फोर्स स्टेशनवरून वेलिंग्टनला जात असताना एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हेलिकॉप्टरमधील फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बचावले, ज्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जनरल रावत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित करण्यासाठी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) येथे जात होते.