प्रतिनिधी
नवी दिल्ली : छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी स्काय डायव्हिंगचा आनंद लुटला. सिंहदेव यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, आकाशाची कोणतीही मर्यादा नसते.WATCH 70-year-old minister jumps from thousands of feet, enjoys skydiving in Australia
ऑस्ट्रेलियातील प्रख्यात स्कायडायव्हिंग केंद्रातील अनुभवी प्रशिक्षकासोबत सिंहदेव यांचे स्कायडायव्हिंग चित्तथरारक दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका सुंदर ठिकाणी झाले. 70 वर्षांचे हे राजकारणी खास जंपसूट घातलेले दिसले.
ते हजारो फूट उंचीवरून उडी मारतात आणि नंतर जमिनीवर येतात, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान, गाइडच्या प्रश्नावर ते म्हणतात की, हा त्यांच्यासाठी खूप आनंददायी अनुभव आहे, हे धाडस त्यांना पुन्हा पुन्हा करायला आवडेल.
मुख्यमंत्री बघेल यांनी केले कौतुक
टीएस सिंहदेव यांच्या या धाडसी पावलाचे खूप कौतुक होत आहे. त्यांचा स्कायडायव्हिंगचा व्हिडिओ आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही त्यांचे कौतुक केले. व्हिडिओला उत्तर देताना बघेल यांनी ट्विट केले की, “वाह महाराज साहेब! तुम्ही चकीत केले! तुमचा उत्साह असाच ठेवा. तुम्ही अप्रतिम धाडस केले.
टीएस सिंहदेव ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव ऑस्ट्रेलियाच्या सार्वत्रिक आरोग्य सेवा प्रणालीचा अभ्यास करतील. या दौऱ्यात आरोग्यमंत्री ऑस्ट्रेलियातील संबंधित अधिकारी आणि या योजनेशी संबंधित जाणकारांचीही भेट घेणार आहेत. यासोबतच सिंहदेव तेथील आरोग्य तज्ज्ञांशीही चर्चा करणार आहेत.
WATCH 70-year-old minister jumps from thousands of feet, enjoys skydiving in Australia
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क