Vodafone Idea : कर्जबाजारी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या अडचणी थांबण्याची चिन्हे नाहीत. अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) गणनेतील त्रुटी सुधारण्यासाठी दूरसंचार कंपन्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. याचा परिणाम व्होडाफोन आयडियाच्या निधी उभारणीच्या प्रयत्नांवर होऊ शकतो. या संदर्भातील विश्लेषकांनी सांगितले की, आता व्होडाफोन आयडियाकडे दिवाळखोरीसाठी अर्ज करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. Vodafone Idea May Have To File For Bankruptcy SC Rejected Reassessment Of Its Dues To The Government
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कर्जबाजारी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या अडचणी थांबण्याची चिन्हे नाहीत. अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) गणनेतील त्रुटी सुधारण्यासाठी दूरसंचार कंपन्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. याचा परिणाम व्होडाफोन आयडियाच्या निधी उभारणीच्या प्रयत्नांवर होऊ शकतो. या संदर्भातील विश्लेषकांनी सांगितले की, आता व्होडाफोन आयडियाकडे दिवाळखोरीसाठी अर्ज करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
कंपनी टॅरिफही वाढवू शकत नाही
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, टेलिकॉम मार्केटमध्ये सध्या सुरू असलेली स्पर्धा पाहता कंपनी आता जास्त टॅरिफही वाढवू शकत नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत कंपनीला सरकारकडून एखादे मोठे रिलीफ पॅकेज न मिळाल्यास पुढील वर्षी एप्रिलनंतर व्होडाफोन आयडियाला आपले अस्तित्व राखणे अवघड होऊन बसेल.
या संदर्भात, अमेरिका स्थित इक्विटी रिसर्च फर्म विल्यम ओ’निल अॅन्ड कंपनीच्या भारतीय युनिटचे इक्विटी रिसर्चचे प्रमुख मयूरेश जोशी म्हणाले, “व्होडाफोन आयडियाकडे काही पर्याय नाहीत. एजीआरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या निधी उभारणीच्या प्रयत्नांवर होऊ शकतो.
एप्रिलपर्यंत द्यावी लागणार 24 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम
पुढील वर्षाच्या एप्रिलपर्यंत कंपनीला 24 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. फंडिंगशिवाय हे करणे कंपनीला अवघड आहे. जर कंपनीत सर्व पर्याय संपत गेले तर दूरसंचार क्षेत्रात दोनच कंपन्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल याच उरतील. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलच्या याचिका फेटाळल्या. त्यांनी एजीआर गणनेतील त्रुटी सुधारण्यासाठी याचिका दाखल केली होती.
एका टॉप ग्लोबल ब्रोकरेजच्या विश्लेषकाच्या मते, व्होडाफोन आयडिया लवकरच दिवाळखोरी कोर्टात जाऊ शकतात. एजीआर थकबाकी बाबत त्यांचे कायदेशीर पर्याय संपले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर संभाव्य जागतिक गुंतवणूकदार फंडिंग करण्याच्या आश्वासनांपासून दूर जाऊ शकतात.
यापूर्वी दूरसंचार क्षेत्राची निगराणी संस्था टेलिकॉम वॉचडॉगने सरकारला कर्जबाजारी व्होडाफोन आयडियाच्या 8292 कोटी रुपयांची थकीत रक्कम अदा करण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी फेटाळण्याची विनंती केली होती.
व्होडाफोन आयडियाने 25 जून 2021 रोजी टेलिकॉम सेक्रेटरीला लिहिलेल्या पत्राद्वारे असे म्हटले होते की, अॅडजस्टर्ड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) च्या देयकासाठी रोख रक्कम वापरून आणि आवश्यक रोखीची निर्मिती करून आपल्या कामकाजासाठी आवश्यक असलेली रोखीची निर्मिती करता येत नाही. यामुळे ते 9 एप्रिल 2021 रोजी देय असलेली 8,292 कोटी एवढी रक्कम देण्यास सक्षम नाहीत.
Vodafone Idea May Have To File For Bankruptcy SC Rejected Reassessment Of Its Dues To The Government
महत्त्वाच्या बातम्या
- JEE Main 2021 : महाराष्ट्रात पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! शिक्षणमंत्री म्हणाले- घाबरू नका, तुम्हाला पुन्हा संधी मिळेल !
- झारखंडमध्ये सरकार पाडण्याचा कट! : रांचीच्या मोठ्या हॉटेलमध्ये छापे; आमदारांच्या घोडेबाजाराची भीती, रोख रकमेसह 4 जणांना अटक
- Raj Kundra Pornography Case : राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीला समोरासमोर बसवून पोलीस चौकशी, अशी दिली शिल्पाने उत्तरे
- मुख्यमंत्र्यांनी दिली दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट, ९ जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित; ७६ मृत्यू, सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले
- अनोखी शस्त्रक्रिया : रुग्णाला भूल न देताच केले ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन, महिला रुग्ण शस्त्रक्रियेदरम्यान म्हणत राहिली हनुमान चालिसा! Watch Video