कोरोनामुळे संपूर्ण देशात रुग्णालयांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विस्तारा या विमान कंपनीनं देशांतर्गत डॉक्टर आणि परिचारिकांसाठी मोफत ये-जा करण्याची सुविधा देण्याची घोषणा केलीय. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने या ऑफरबद्दल माहिती दिलीय. संकटाच्या वेळी आम्ही या योद्धांच्या सर्व सुविधांची काळजी घेऊ, असेही कंपनीने म्हटले आहे.vistara airline’s fight against corona, free travel facility for doctors-nurses
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कोरोनामुळे संपूर्ण देशात रुग्णालयांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विस्तारा या विमान कंपनीनं देशांतर्गत डॉक्टर आणि परिचारिकांसाठी मोफत ये-जा करण्याची सुविधा देण्याची घोषणा केलीय.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने या ऑफरबद्दल माहिती दिलीय. संकटाच्या वेळी आम्ही या योद्धांच्या सर्व सुविधांची काळजी घेऊ, असेही कंपनीने म्हटले आहे.
उषा पाधी यांनी आपल्या ट्विटमध्ये विस्ताराच्या पत्राबद्दल माहिती दिलीय. आपण एकत्र या संकटाशी लढाऊ या, असे म्हणत सरकारी संस्था आणि रुग्णालयांच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी विस्तारा हवाई वाहतुकीची सुविधा देण्यास तयार आहे.
कोरोनाशी सामना करण्यासाठी कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या विनामूल्य हवाई प्रवासाचा प्रस्ताव दिलाय. फ्रंटलाईन कामगारांना एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी विनामूल्य घेऊन जाणार आहेत.
आपल्या डॉक्टर आणि परिचारिकांना एका ठिकाणाहून दुसºय ठिकाणी ये-जा करण्याची सुविधा देऊ शकल्यास आम्हाला खूप आनंद होईल, असे पत्रात म्हटलेय. काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या जागी परत पाठवण्याची जबाबदारी देखील घेऊ शकतो.
विस्तारा यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे, की जागांची मयार्दीत उपलब्धता लक्षात घेता आम्ही वैद्यकीय डॉक्टर्स आणि नर्सेसना पहिल्यांदा आल्यास पहिल्या जागा उपलब्ध करून देणार आहोत.
या व्यतिरिक्त स्पाईसजेट आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी देश किंवा विमान उड्डाण तिकिटांसाठी वेळ किंवा तारीख बदलण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. इंडिगो 30 एप्रिलपर्यंत आणि 15 मेपर्यंत स्पाईसजेट या नव्या बुकिंगसाठी चेंज शुल्क घेणार नाही.
vistara airline’s fight against corona, free travel facility for doctors-nurses
महत्त्वाच्या बातम्या
- थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क घातला नाही म्हणून १४,२७० रुपये दंड, गव्हर्नरनेच केली होती तक्रार
- पाच लाखांहून अधिक जणांना लस , महाराष्ट्राची एका दिवसातील विक्रमी कामगिरी ; आता दीड कोटींचा टप्पा गाठणार
- भारतासोबत महासत्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जपानचे प्रधानमंत्री योशिहिदो सुगा यांच्यासोबत चर्चा
- बाथरूममध्ये कोंडून ज्येष्ठ दांपत्याला लुटले , पुण्यातील धक्कादायक घटना; 16 लाखांचा ऐवज लंपास