• Download App
    भारत- पाकिस्तान सामन्याला विश्व हिंदू परिषदेचा विरोध, सामन्यात हरविण्याऎवजी सर्जिकल स्ट्राईक करून हरविण्याची मागणी|Vishwa Hindu Parishad opposes India-Pakistan match, demands surgical strike instead of playing the match

    भारत- पाकिस्तान सामन्याला विश्व हिंदू परिषदेचा विरोध, सामन्यात हरविण्याऎवजी सर्जिकल स्ट्राईक करून हरविण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 24 तारखेला होणाऱ्या सामन्याची संपूर्ण जगात उत्सुकता आहे मात्र विश्व हिंदू परिषदेने या सामन्याला विरोध केला आहे. पाकिस्तानला खेळाच्या मैदानात हरवण्यापेक्षा सर्जिकल स्ट्राईक करून हरवावे, अशी मागणी केली आहे.Vishwa Hindu Parishad opposes India-Pakistan match, demands surgical strike instead of playing the match

    विश्व हिंदू परिषदेनेही भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये असे म्हटलं आहे. या सामन्याला गिरीराज सिंग तसेच एआयएमआयचे असदुद्दीन ओवेसी यांनीही विरोध केला आहे. सामन्यावर प्रश्न उपस्थित करत हा सामना खेळवला जाऊ नये असं म्हटलं आहे.



    विश्व हिंदू परिषदेने बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही टीका केली आहे. बांग्लादेश सरकारने 2013 मध्ये हिंदूंची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी कायदा तयार केला. 10 दिवसात 150 मंदिरं तोडण्यात आली. 360 हून अधिक मूर्तींची तोडफोड झाली. हजारो हिंदूंची दुकानं आणि घरं लुटण्यात आली. अशी परिस्थिती बांग्लादेशात आहे. अशात आपण पाकिस्तानशी क्रिकेट सामना कसा खेळू शकतो असा प्रश्न विहिंपने विचारला आहे.

    पाकिस्तानला भारताने शत्रू राष्ट्र घोषित करावं. शत्रूवर सर्जिकल स्ट्राईक करावा. सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानचं अस्तित्वच देशाच्या नकाशावरून मिटवलं गेलं पाहिजे. काश्मीरमध्ये बदल होत आहेत ते पाकिस्तानला मान्य नाहीत. काश्मीरचा विकास झपाट्याने करा पण पाकिस्तानचं कंबरडं मोडा अशीही मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

    Vishwa Hindu Parishad opposes India-Pakistan match, demands surgical strike instead of playing the match

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!