• Download App
    वीरेंद्र सेहवागने केला खुलासा , म्हणाला- आता भारत असा जिंकणार टी-20 वर्ल्ड कपVirender Sehwag revealed that India will now win the T20 World Cup

    वीरेंद्र सेहवागने केला खुलासा , म्हणाला- आता भारत असा जिंकणार टी-२० वर्ल्ड कप

    वीरेंद्र सेहवागचेही म्हणणे आहे की, भारतीय संघाला विजेतेपदासाठी चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे.टीम इंडियाला २०२१ च्या T२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला.Virender Sehwag revealed that India will now win the T20 World Cup


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने सांगितले की, टीम इंडिया पहिला सामना पाकिस्तानकडून जरी हरला असला तरी, त्याला अजूनही वाटते की, संथ सुरुवात असूनही, टीम इंडिया आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ ची ट्रॉफी जिंकू शकते. वीरेंद्र सेहवागचेही म्हणणे आहे की, भारतीय संघाला विजेतेपदासाठी चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे.

    टीम इंडियाला २०२१ च्या T२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने ‘टीम इंडिया’ला १५१ धावांवर रोखले आणि लक्ष्याचा पाठलाग करताना १० गडी राखून विजय मिळवला. विश्वचषकाच्या इतिहासात भारतावर पाकिस्तानचा हा पहिलाच विजय ठरला.आता भारताचा दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडशी खेळायचा आहे.



    विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ अजूनही विश्वचषक जिंकू शकतो, असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. टीम इंडिया हरली तरी आम्हाला टीमला साथ देण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सेहवाग त्याच्या वीरुगिरी शोमध्ये म्हणाला, “माझ्या मते, टीम इंडिया हा T२० विश्वचषक जिंकेल. त्यांना इथून पुढे आणखी चांगले क्रिकेट खेळायचे आहे.आम्ही आमच्या संघासाठी नेहमी आनंदी असतो जेव्हा तो जिंकतो तेव्हा नाही तर तो हरतो तेव्हा.” भारत टी-२० विश्वचषक जिंकू शकेल, असा माझा विश्वास आहे.”

    दुसरीकडे, पाकिस्तानने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केल्यामुळे ICC पुरुष T२० विश्वचषक २०२१ च्या उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या एक पाऊल जवळ आहे. त्याबद्दल बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, पाकिस्तान उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे कारण त्यांचे पुढील सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध होणार आहेत.

    “या विजयासह, पाकिस्तानची उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे कारण त्यांचे सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. त्यांनी त्यांचे पुढील दोन सामने जिंकले तरी ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील,” सेहवाग म्हणाला.पाकिस्तानने पहिले दोन सामने जिंकले आहेत.पाकिस्तानचा आणखी एक मोठा विजय उपांत्य फेरी गाठण्याचा त्यांचा दावा पक्का करेल.

    Virender Sehwag revealed that India will now win the T20 World Cup

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    B. Sudarshan Reddy : निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार; NDAचे सीपी राधाकृष्णन यांच्या विरोधात निवडणूक लढवणार

    महाराष्ट्र निवडणुकीत मत चोरी नाही; राहुल गांधींनी ज्या आकडेवारीवरून केले आरोप, तीच चुकीची; लोकनीती-CSDS सह-संचालकांनी मागितली माफी

    ऑनलाइन गेमिंग उद्योगावर गदा येण्याची शक्यता, केंद्र सरकारकडून बंदीची तयारी!