वृत्तसंस्था
उज्जैन: क्रिकेटर झुलन गोस्वामी वर आधारित स्पोर्ट्स बायोपिक ‘चकडा एक्सप्रेस’ यात अनुष्का शर्मा आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आणि क्रिकेटची चौथी आणि शेवटची कसोटी 9 मार्च पासून अहमदाबाद मध्ये होणार आहे. यात यश मिळावे यासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सेलिब्रिटी कपल महाकालेश्वराच्या दर्शनासाठी गेले होते. Virat – Anushka’s darshan at Mahankal temple for the promotion of cricketer Jhulan Goswami’s biopic!!
क्रिकेट सारखा वेस्टन खेळ खेळताना भारतीय कल्चर आणि त्याबद्दल असलेली आस्था जपत भारताला रिप्रेसेंट करणारे आपले बरेच खेळाडू आहेत. सध्याच ऑस्ट्रेलिया सोबतच्या भारताच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या आधी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली.
“आम्ही येथे प्रार्थना करण्यासाठी आलो होतो. आणि महाकालेश्वराचे चांगले दर्शन देखील आम्हाला घडले.” असे अनुष्का शर्मा ने ANI न्यूजमध्ये सांगितले.
सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये हे सेलिब्रिटी जोडपे यात्रेकरूनसोबत मंदिरात बसलेले दिसत होते. इंदूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी शनिवारी सकाळी महाकालचे दर्शन घेतले. विराट आणि अनुष्का धार्मिक लोक आहेत. 2023 च्या सुरुवातीला त्यांची मुलगी वामिकासह त्यांनी ऋषिकेश आणि वृंदावनलाही भेट दिली होती. ऋषिकेश मध्ये स्वामी दयानंद यांच्या आश्रमात स्वामी दयानंदजींच्या समाधीचे देखील दर्शन घेतले.
Virat – Anushka’s darshan at Mahankal temple for the promotion of cricketer Jhulan Goswami’s biopic!!
महत्वाच्या बातम्या
- Bamboo Crash Barrier : अद्भुत भारत! जगातील पहिला २०० मीटर लांब ‘बांबू क्रॅश बॅरियर’ बसवण्यात आला महाराष्ट्रातील महामार्गावर
- Attack on Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक, ओळखही पटली
- भाजपा- शिवसेनेची मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आशीर्वाद यात्रा; पण साध्य काय करणार??