रामनवमी रविवारी देशभरात श्रद्धेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पण, चार राज्यांतील सहा शहरांमध्ये मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामुळे परिस्थिती इतकी बिघडली की झारखंडमध्ये एकाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये 70 कुटुंबे बेघर झाली आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी दंगेखोरांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर गुजरात-बंगालमध्येही कलम 144 लागू करण्यात आले.Violence in Ram Navami in 6 cities in 4 states one killed in Jharkhand, 70 families flee in Madhya Pradesh; The situation in Gujarat-Bengal also deteriorated
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रामनवमी रविवारी देशभरात श्रद्धेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पण, चार राज्यांतील सहा शहरांमध्ये मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामुळे परिस्थिती इतकी बिघडली की झारखंडमध्ये एकाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये 70 कुटुंबे बेघर झाली आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी दंगेखोरांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर गुजरात-बंगालमध्येही कलम 144 लागू करण्यात आले.
झारखंमध्ये एकाचा मृत्यू, बोकारोत दगडफेक
झारखंडमधील लोहरदगा आणि बोकारोमध्ये रविवारी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिली घटना लोहरदगा येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हिराही गावात घडली. यामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसवरही दगडफेक करण्यात आली. लोहरदगा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशः खरगोनमध्ये 30 घरे आणि दुकाने जाळली
मध्य प्रदेशातील खरगोन येथे रविवारी सायंकाळी श्रीराम शोभायात्रेवर तालाब चौकाजवळ दगडफेक करण्यात आली. हल्लेखोरांनी 30 हून अधिक दुकाने आणि घरांना आग लावली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हे प्रकरण थोडे शांत झाले, मात्र रात्री १२ वाजता पुन्हा हिंसाचार उसळला. आनंद नगर, संजय नगर, मोतीपुरा येथे घरे जाळण्यात आली. काही घरेही लुटली. त्यामुळे 70 हून अधिक कुटुंबांना घरे सोडून इतर ठिकाणी जावे लागले.
या घटनेत 10 पोलीस कर्मचारी आणि 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. एसपी सिद्धार्थ चौधरी यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. पोलिसांनी सोमवारी सकाळपर्यंत 70 हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते.
गुजरातच्या हिम्मतनगर आणि खंभातमध्ये रामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक
रविवारी रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत उत्तर गुजरातमधील हिम्मतनगर आणि खंभातमध्ये दगडफेक करण्यात आली. हिमतनगरमध्ये झालेल्या दगडफेकीत एसपी आणि 10 पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. तेव्हापासून शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आरोपींवर कारवाई करण्यासाठी RAF (रॅपिड अॅक्शन फोर्स) चे पथकही शहरात पोहोचले.
बंगालच्या हावडा येथे हिंसक चकमकीत पोलीस कर्मचारीही जखमी
बंगालमधील हावडा येथील शिवपूर भागात रामनवमीच्या मिरवणुकीतही हिंसक चकमक झाली आहे. या हल्ल्यात पोलीस हवालदार आणि अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाल्याचे भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे. शुभेंदू अधिकारी म्हणाले की, राज्यात सनातन धर्मावर बंदी आहे का?
या घटनेबाबत हावडा पोलिसांनी सांगितले की, शिवपूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्वांनी संयम राखण्याचे आवाहन करतो आणि सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक गोष्टी शेअर करू नका.
Violence in Ram Navami in 6 cities in 4 states one killed in Jharkhand, 70 families flee in Madhya Pradesh; The situation in Gujarat-Bengal also deteriorated
महत्त्वाच्या बातम्या
- तामीळ वाघांना पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न, ईडीने कारवाई करून भारतीयांची ३ कोटी ५९ लाखांची संपत्ती केली जप्त
- किरीट सोमय्यांसोबत दरेकरांवर सूडबुध्दी, मुंबई बँक प्रकरणात पुन्हा चौकशी
- रसातळातल्या काँग्रेसचे उपद्रवमूल्य!!; भारतीय संघराज्याला उलट्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न!!
- घरच्याच आव्हानांमुळे समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले ढासळू लागले, विधान परिषदेत बसणार झटका