शोभायात्रेत महिला आणि लहान मुलांवर दगडफेक करण्यात आली.
विशेष प्रतिनिधी
West Bengal Hooghly Violence: पश्चिम बंगालमध्ये आज (२ एप्रिल) पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. हुगळीत भाजपच्या शोभा यात्रेदरम्यान जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्या रिशडामध्ये झालेल्या कार्यक्रमात गदारोळ झाला आहे. हिंसाचारानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. Violence again in West Bengal Arson and stone pelting at BJP MP event
हिंसाचार भडकल्यानंतर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलीप घोष यांना सुरक्षित स्थळी नेले. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप खासदार दिलीप घोष म्हणाले की, शोभा यात्रेत महिला आणि लहान मुलांवर दगडफेक करण्यात आली. हावडा हिंसाचारानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. आताही दगडफेक होत असून वाहनांची तोडफोड केली जात आहे.
यापूर्वी हावडा येथे हिंसाचार झाला होता –
यापूर्वी रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमधील हावडा शहरातील काझीपाडा भागात हिंसाचार झाला होता. ही मिरवणूक काझीपाडा परिसरातून जात असताना ही घटना घडली. हिंसाचारात अनेक दुकाने आणि ऑटो-रिक्षांची तोडफोड करण्यात आली, तर पोलिसांच्या काही वाहनांसह अनेक गाड्या जाळण्यात आल्या. हावडा येथील हिंसाचारात भारतीय जनता पक्ष आणि बजरंग दल यासारख्या संघटना शस्त्रांसह सामील असल्याचा आरोप मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केला होता.
पोलिसांवर पुन्हा दगडफेक –
मुख्यमत्री ममता बॅनर्जींनी परिसरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र यानंतर शुक्रवारी दुपारीही काझीपाडा परिसरात अज्ञातांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लोकांना पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला आणि दगडफेकीत तीन पोलिस जखमी झाले. गुरुवारपासून हिंसाचारप्रकरणी ४५ जणांना अटक करण्यात आली आहे.
Violence again in West Bengal Arson and stone pelting at BJP MP event
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा